Santosh Deshmukh Murder Case Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एका महिन्याच्यावर कालावधी उलटून गेला आहे. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. अशातच आज देशमुख कुटुंबही आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. याप्रकरणाच्या तपासाची कोणतीही माहिती आम्हाला दिली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनही केलं. दरम्यान, आता संतोष देशमुख यांच्या लेकीनंही प्रशासनाला संतप्त सवाल केला आहे.