महाराजांचंही ठरलंय! ना भाजप-ना सेना, उदयनराजे राष्ट्रवादीतच पुन्हा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 September 2019

उदयनराजे यांनी पवार यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाच्या चर्चला ब्रेक लावलाय. उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं निश्चित झाल्याच समजतंय.

पुणे ः राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. माञ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांनी पुण्यात भेट घेतली. मोदी बागेत तब्बल पावणेदोन तास ही बैठक सुरू होती. बैठकीला विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आमदार शशिकांत शिंदे हेही उपस्थित होते. उदयनराजे यांनी पवार यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाच्या चर्चला ब्रेक लावलाय. उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं निश्चित झाल्याच समजतंय.

दरम्यान, या बैठकीनंतर आमदार संदिप बाजोरिया, नगरचे प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राहूल मगर, बाळासाहेब मिसाळ, संध्याताई कुपेकर, दत्ता मसुरकर, घनश्याम शेलार, महंमद शब्बीर यांच्यासह अनेक नेत्यांनी पवार यांच्याशी बैठक झाली.  

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार आहेत, आणि आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचाराचे मुद्दे आणि रणनीतीवरती चर्चा झाल्याचं सांगितलं. उदयनराजेंची कोणतीही नाराजी नाही. ते  पक्षातच असून, जाण्याची चर्चा कुठे झालेले नाही. ते कधीही भाजपच्या प्रवेशावर बोलले नाही. मात्र भाजपच्या गोटातून माध्यमांच्या माध्यमातून ही चर्चा केली जात आहे.

दरम्यान, जनतेचे मत इतर समस्यांवरून इतरत्र वळवण्यासाठी भाजपनं असे प्रयत्न सुरू केलेत. शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी त्यांच्यामागे इतर कामांचा व्याप होता. त्यामुळे ते येऊ शकले नाही. इतर काही राजकीय कारण नाही आणि ते नाराज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara MP udayan raje will remain NCP