esakal | मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा; शाहू महाराज
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा;  शाहू महाराज

मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा; शाहू महाराज

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्‍हापूर : राज्यात पुन्‍हा एकदा मराठा समाजाने कोल्‍हापुरातून आरक्षणासाठी रणशिंग फुंकले आहे. आम्‍ही बोललो, आता तुम्‍ही बोला असे सांगत सर्व लोकप्रतिनिधींना भूमिका मांडण्याचे आवाहन संयोजकांनी केले. त्यानुसार आज राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्‍थळावर मूक आंदोलनास सुरुवात झाली .या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्‍थित राहिले आहेत. या आंदोलनात लोकप्रतिधींनी आपले मत व्यक्त केले. यावेळी मराठा आरक्षणासाठी(maratha-reservation) केंद्राकडे पाठपुरावा करा असे आवाहन आज कोल्‍हापूरातील मूक आंदोलनात शाहू महाराज छत्रपतींनी केले आहे.(shahu- maharaj- chhatrapati-maratha-reservation-appeal-to-the-people-representatives-in -the-silent-agitation-in-Kolhapur)

महाराज म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत(maratha-reservation) पंतप्रधान मोदींची PM modi) भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन दिल्लीत पाठपुरावा करायला हवा.अलीकडच्या काळात मराठा समाज नाराज होता. मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत देण्याचा प्रयत्न असेल.समाजात दुफळी निर्माण करण्याचाही प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे आरक्षण परत कसे मिळवावे याचा आता विचार करायला हवा. आतापर्यंत 58 मोर्चे शांततेत काढलेले आहेत. त्यामुळे आता राज्याने पुनर्विचार याचिका दाखल करावी. असे आवाहन मूक आंदोलनात शाहू महाराज छत्रपतींनी लोकप्रतिनिधींना केले आहे.

या आंदोलनात सर्वच लोकप्रतिनिधींनी आरक्षणासाठी आवश्यक ती सर्व ताकत पणाला लावण्याची घोषणा केली. तसेच संभाजीराजे छत्रपती यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्यांची पुर्तता करण्यासाठी प्रयत्‍न करणार असल्याचे सांगितले. सारथीचे सक्षमीकरण, जिल्‍हानिहाय शाखा, मराठा मुलांना मिळणाऱ्या शिष्‍यवृत्तीत वाढ करणे, आण्‍णासाहेब पाटील महामंडळाची जी कर्जमर्यादा आहे, त्यात वाढ करण्यासाठी सरकार सकारात्‍मक असल्याचे सर्वच लोकप्रतिनिधींनी सांगितले. या मूक आंदोलनात जिल्‍हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के.पी.पाटील, मालोजीराजे छत्रपती, अमल महाडिक, महेश जाधव, भाजपचे जिल्‍हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, गोकुळचे अध्यक्ष विश्‍‍वास पाटील आदी उपस्‍थित होते.

हेही वाचा- मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन : संभाजीराजे

पक्षांचा अजेंडा राबवू नका

अनेक नेत्यांनी आपल्या राजकीय पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्‍न केला. कोणत्या पक्षाची चूक झाली, कोणत्या सरकार विरोधात आंदोलन करणे आवश्यक आहे, हे सांगण्याचाही प्रयत्‍न केला. मात्र संयोजकांनी सर्वच लोकप्रतिनिधींना पक्षाचा अजेंडा न मांडण्याची सुचना केली.

loading image