
सतिश उकेंच्या वकिलांनी 'ईडी'वर केला गंभीर आरोप, म्हणाले...
कॉंग्रेस नेते नाना पटोलेंचे वकिल अॅड. सतिश उके यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. या घटनेनंतर जमीन गैरव्यवहारप्रकरणी अमलबजावणी संचालनालयाने (ED) सतिश उके (Satish Uke) आणि त्यांचे बंधू प्रदीप यांना अटक केली आहे. यानंतर यांना मुंबईत आणण्यात आले आहे. त्यांच्यावर सुमारे 11.5 कोटी रुपयांच्या मनीलाँर्डिंग (Money Laundering) प्रकरणात कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ईडीकडून योग्यपध्दतीने कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे.
हेही वाचा: गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले, म्हणाले....
आज उके यांचे वकील ईडी कार्यालयात गेले होते. पण त्यांना भेटू दिले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागपूरमधील (Nagpur) घरी सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर ईडीने उके व त्यांच्या बंधूना गुरूवारी सकाळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच संध्याकाळी त्यांना विमानाने मुंबईत आणण्यात आले. मुंबईतही त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या रिमांडसाठी विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.
यावेळी ते म्हणाले की, सतिश उके आणि त्यांच्या बंधूंना मुंबईत घेऊन आले आहेत. ईडी ही स्वत:चीच प्रक्रिया करत आहे. कायद्यावर कोणतीही संस्था नाही. पण त्यांच्याकडून कायदेशीर प्रक्रिया पार पाडली गेली नाही. त्यांनी मला 30 ते 40 मिनिटे बाहेर थांबायला लावले. पण त्यानंतर मला आतमध्ये येऊ दिले नाही. आम्ही या सर्व बाबी न्यायालयासमोर मांडू. न्यायालय यावरून योग्य तो निर्णय घेईल, असं उके यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं. प्रदीप उके हे माजी पोलीस कर्मचारी असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयातील माजी न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
हेही वाचा: राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर चंद्रकांत पाटील विठ्ठल नामात दंग
Web Title: Satish Uke And His Brother Arrested By Ed Money Laundering Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..