Satyajeet Tambe : सत्यजीत यांना मिळाला होता कोरा एबी फॉर्म, तरी...? सोशल मीडियावर रंगली चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole, Balasaheb Thorat and Satyajeet Tambe

Satyajeet Tambe : सत्यजीत यांना मिळाला होता कोरा एबी फॉर्म, तरी...? सोशल मीडियावर रंगली चर्चा

मुंबई - नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीच्या उमेदवारी दाखल करताना घडलेल्या घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले होते. आता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनाही सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. यावर सत्यजीत तांबे यांची प्रतिक्रिया आली आहे. सोशल मीडियावर सत्यजीत तांबे यांना पाठिंबा मिळत आहेत. मात्र त्याचवेळी काँग्रेस पक्षाकडून कोरा एबी फॉर्म देऊनही त्यांनीच घेतला नसल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाली आहे. (Satyajeet Tambe news in Marathi)

हेही वाचा: Sikander Sheikh : सिकंदरची जबरदस्त कामगिरी! अनुभवी मल्लांना लोळवून ठरला 'विसापूर केसरी'

नाशिक पदवीधर मतदार संघासाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत पुत्र सत्यजीत तांबे यांना उमेदवारी दाखल करण्यास सांगितलं. त्यामुळे काँग्रेसची गोची झाली होती. त्याचवेळी पक्षाकडून सत्यजीत यांच्या नावाचा ऐबी फॉर्म न आल्यामुळे सत्यजीत अपक्ष उमेदवारी दाखल करत असल्याचं सांगण्यात आलं होतं.

हेही वाचा: Shiv Sena : धनुष्यबाण कुणाचे? निवडणूक आयोगासमोरील आधीचा युक्तिवाद ठरणार महत्त्वपूर्ण; काय झालं होतं...

दरम्यान सत्यजीत यांनी आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचं सांगत भाजपच्या नेत्यांना देखील पाठिंब्यासाठी आवाहन करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे सत्यजीत भाजपच्या गळाला लागले, असं सांगण्यात येऊ लागलं. त्याचवेळी काँग्रेसने त्यांना डावललं, असंही सांगण्यात येत होत. यातून सोशल मीडियावर युवक काँग्रसच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्यजीत यांना पाठिंबा दर्शविण्यात आला. मात्र पदाधिकाऱ्यांच्या या पाठिंब्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेण्यात येत आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून कोरा ऐबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र सत्यजीत यांनीच तो घेतला नसल्याचा दावा करण्यात आला.

एकंदरीतच याबाबत अद्याप संभ्रम असला तरी सत्यजीत यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली. मात्र ऐबी फॉर्मबाबत त्यांनी कुठलाही खुलासा केला नाही. त्यामुळे खरच त्यांना कोरा ऐबी फॉर्म मिळाला होता की नाही, याबाबत संभ्रम आहे.