Satyajeet Tambe : अपक्ष फॉर्म संदर्भात सत्यजीत तांबेंचा मोठा खुलासा

अपक्ष अर्ज दाखल भरण्यावर सत्यजीत तांबेंनी खुलासा
Satyajeet Tambe
Satyajeet TambeEsakal

नाशिक पदवीधर मतदार संघासाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत पुत्र सत्यजीत तांबे यांना उमेदवारी दाखल करण्यास सांगितलं. त्यामुळे काँग्रेसची गोची झाली होती. त्याचवेळी पक्षाकडून सत्यजीत यांच्या नावाचा एबी फॉर्म न आल्यामुळे सत्यजीत अपक्ष उमेदवारी दाखल करत असल्याचं सांगण्यात आलं होतं.

या अपक्ष अर्ज दाखल भरण्यावर सत्यजीत तांबेंनी खुलासा केला आहे. बोलताना ते म्हणाले की, 'मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मी काँग्रेसचा फॉर्म भरला होता, पण तांत्रिक कारणाने मला एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून माझा फॉर्म अपक्ष झाला' असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं आहे.

Satyajeet Tambe
Satyajeet Tambe : सत्यजीत यांना मिळाला होता कोरा एबी फॉर्म, तरी...? सोशल मीडियावर रंगली चर्चा

विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नाशिकमधून सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यांच्यावर काँग्रेसकडून निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आज अखेर अपक्ष अर्ज का भरला याचा पहिल्यांदाच खुलासा सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

Satyajeet Tambe
Jayant Patil: 'पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी'; जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

पुढे बोलताना ते म्हणाले की, 'सगळ्या लोकांचा मला पाठिंबा असून सगळे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून मी काँग्रेसचा फॉर्म भरला होता पण तांत्रिक कारणाने मला एबी फॉर्म मिळाला नसल्याने माझा फॉर्म अपक्ष भरावा लागला, असं सत्यजित तांबे यांनी सांगितलं आहे.

Satyajeet Tambe
Prakash Ambedkar : "शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com