
फुलंब्री: बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्याच्या परिसरामध्ये काम करणाऱ्या एका मित्राकडे पिस्तूल असल्याने ते कसे चालते हे दाखवत असताना अचानक पिस्तूलमधून गोळी सुटून समोरच असणाऱ्या दुसऱ्या मित्राच्या कमरेच्या भागात गोळी लागली. त्यामुळे भरत घाटगे हा गंभीर जखमी झाला. तर दुसरा पिस्टल असणारा मित्र करण भालेराव पिस्टल घेऊन फरार झाल्याची घटना शुक्रवारी (ता.११) रात्री घडली आहे. याबाबत शनिवारी (ता.१२) पहाटे अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.