India's first lady teacher : आज 3 जानेवारी अर्थात सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. बालविवाहाच्या जोखडातून मुक्त करत स्त्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून पती महात्मा ज्योतीबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. पती महात्मा जोतिबा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी शिक्षणाच्या कार्यात कोणत्याही प्रकारचा खंड कधी पडू दिला नाही.
त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित घटकांच्या, विशेषत: महिला आणि दलितांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यात गेले. सामाजिक कार्यासोबत सावित्रीबाईंनी एक प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी सामाजिक प्रबोधनासोबत छत्रपती शिवाजी महाराज महाराणी ताराबाई यांच्यावरही कविता लिहित जाज्वल्य इतिहासाचे स्मरण केले.