'सेट' परीक्षेची तारीख ठरली; डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

यापूर्वी 28 जून रोजी ही परीक्षा होणार होती, पण कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी 'सेट'ची परीक्षा 27 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

'मुख्यमंत्र्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवावे!'

महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून नोकरी मिळविण्यासाठी 'सेट'ची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठ ही परीक्षा आयोजित करते. यापूर्वी 28 जून रोजी ही परीक्षा होणार होती, पण कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता विद्यापीठाने 27 डिसेंबर ही परीक्षेची तारीख निश्‍चित केली आहे. परीक्षेबाबतची माहिती http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पुणे : उद्यानांबाबत महापौर मोहोळ यांचा मोठा निर्णय; वाचा काय म्हणाले महापौर​

सेट परीक्षा ही 38 विषयांसाठी घेतली जाते. यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून 1 लाख 11 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये पुण्यातून सर्वाधिक 19 हजार अर्ज दाखल झालेले आहे. या परीक्षेत पेपर एकमध्ये 100 गुण आणि 50 प्रश्‍न असतात. तर पेपर दोनमध्ये 200 गुण आणि 100 प्रश्‍न असतात. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने होते, अशी माहिती सेट विभागाकडून देण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University will conduct the SET examination on December 27