शिक्षणमंत्री म्हणाल्या ! प्रजासत्ताक दिनी सुरु होतील प्राथमिक शाळा ; उपचारात्मक अध्यापनावर राहणार भर

School Education Minister Varsha Gaikwad said that primary schools will start on Republic Day
School Education Minister Varsha Gaikwad said that primary schools will start on Republic Day
Updated on

सोलापूर : कोरोनामुळे पहिली ते आठवीच्या वर्गातील दीड कोटी मुलांच्या शालेय चाचण्या यंदा झाल्या नाहीत. स्वाध्याय संचद्वारे त्यांची घरबसल्या परीक्षा घेतली. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा बौध्दिक स्तर कमी झाल्याचे समोर आले. या पार्श्‍वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा स्तर पडताळून उपचारात्मक अध्यापनावर भर दिला जाणार आहे.

'शाळा बंद, पण ऑनलाइन शिक्षण सुरु' या उपक्रमांतर्गत पहिली ते बारावीपर्यंतच्या सुमारे सव्वादोन कोटी मुलांना शिक्षणाचे धडे दिले. मात्र, विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने नववी ते बारावीपर्यंतच्य शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरु केल्या. सद्यस्थितीत राज्यातील 22 हजार 204 शाळांपैकी 11 हजार 500 पर्यंत शाळा सुरु झाल्या आहेत. 56 लाख 48 हजार 28 विद्यार्थ्यांपैकी साडेसहा लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत हजेरी लावत असतानाही ते विद्यार्थी कोरोनापासून सुरक्षित राहिले आहेत. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी त्यासाठी परिश्रम घेतले असून, दररोज तीन तासांत गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांचे धडे दिले जात आहेत. आता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु झाल्यानंतर सुरवातीला काही महिने दोन ते तीन तासांचीच शाळा भरविण्याचे नियोजनही शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

शाळा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु करण्याचे नियोजन

पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात की 26 जानेवारीला सुरु करायच्या, याचे नियोजन सुरु आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडे त्यासंबंधीचा अभिप्राय मागविला आहे. त्यांच्या अभिप्रायानुसार नियोजन होईल. ऑनलाइन, ऑफलाइन, स्वाध्याय संच, गृहभेटीद्वारे शिक्षण दिले जात आहे. परंतु, राज्यातील प्रत्येक भागातील परिस्थिती वेगळी असल्याने शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा बौध्दिक स्तर पाहून उपचारात्मक अध्यापनावर भर दिला जाईल.
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री

पहिल्या टप्प्यातच होईल चाचणी

कोरोनाच्या संकटामुळे मार्चपासून शाळांना टाळे आहे. विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन, ऑफलाइन, स्वाध्याय संच, गृहभेटी, सोशल मीडियातून शिक्षण दिले जात आहे. मात्र, बहुतांश शिक्षक ऑनलाइनला बगल देत फोनवरुन विद्यार्थी तथा त्यांच्या पालकांशी संवाद साधत आहेत. काहीजण सोशल मीडियासह अन्य माध्यमातून शिक्षण देत आहेत. काही शिक्षकांनी कोरोना ड्युटी तथा आजारपणाची कारणे देत अध्यापनच केले नसल्याचीही चर्चा आहे. शहरी व ग्रामीण भागातील विशेषत: विदर्भ, मराठवाड्यातील परिस्थिती वेगळी असून, काही विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणाची साधनेच नाहीत. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर चाचणीच्या माध्यमातून सर्वच विद्यार्थ्यांचा बौध्दिक स्तर पडताळला जाणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com