ZP school
ZP schoolsakal

शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही - वर्षा गायकवाड

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
Published on

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम व्यक्त करण्यात येत होता. मात्र, यावर आता शालेय शिक्षण विभागानं स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यातील शाळा १५ जूनलाच सुरु होतील. तसेच विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक असणार नाहीत, असं आरोग्य मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. (Schools in Maharashtra will start on June 15 Masks not Mandatory for Students)

मंत्री गायकवाड म्हणाल्या, आम्ही कोविडच्या स्थितीचा आढावा घेत आहोत. पण कोविडच्या योग्य नियमावलींसह आम्ही १५ जून रोजी शाळा सुरु करणार आहेत. शाळेत येताना विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक असणार नाही. यापार्श्वभूमीवर नव्या एसओपीज जाहीर करण्यात येतील. तसेच पुढील निर्णय हे परिस्थिती पाहुन घेतले जातील, असंही शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं.

ZP school
मुख्यमंत्र्यांनी मविआच्या आमदारांची उद्या बोलावली बैठक

दरम्यान, राज्य मंडळाच्या शाळा १३ जून तर केंद्रीय मंडळाच्या शाळा ८ जूनपासून सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन शाळा उघडल्या जातील. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचाही प्रश्न आहे. लसीकरण वाढवण्याबाबत टास्क फोर्सशी सल्ला घेण्यात येईल, असे गायकवाड यांनी काल म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com