

तात्या लांडगे
सोलापूर : यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांना दिवाळीच्या ११ दिवस सुट्ट्या असणार आहेत. ५ ते १७ नोव्हेंबर या काळात या सुट्ट्या असणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक संघाने शाळांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, शैक्षणिक वर्षात २३७ दिवस अध्यापनाचे असणार आहेत.
चालू ऑगस्ट महिन्यात शाळांना शनिवारी स्वातंत्र्य दिनाची, १७ ऑगस्टला नागपंचमीची, २६ ऑगस्टला ईद-ए-मिलादची आणि २८ ऑगस्टला रक्षाबंधनाची सुट्टी असणार आहे. या महिन्यात पाच रविवारीदेखील शाळांना सुट्टी असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) नियमानुसार, शैक्षणिक वर्षात परीक्षेचे दिवस वगळून किमान २२० दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे, अशी अपेक्षा आहे.
शैक्षणिक वर्षात ७६ दिवस सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. यात मुख्याध्यापकांच्या अधिकारातील एक सुट्टी असेल. याशिवाय वर्षातील ५२ रविवारीदेखील शाळांना सुट्टी राहील. शैक्षणिक वर्षात कामाचे एकूण २३७ दिवस असतील. त्यात परीक्षेचे दिवसदेखील असणार आहेत.
अंतिम सत्र परीक्षा एप्रिलअखेर
यंदा मतदार पुनरीक्षण, जनगणना आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामामुळे बहुतेक शिक्षकांना अध्यापनासाठी कमी दिवस मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील शालेय विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलनंतरच घेतली जाणार आहे. १ मे रोजी परीक्षांचा निकाल जाहीर होऊन १४ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असणार आहे.
यंदाच्या सार्वजनिक सुट्ट्या अशा...
ऑगस्ट : (स्वातंत्र्य दिन/पारशी दिन : १५ ऑगस्ट, नागपंचमी : १७ ऑगस्ट, ईद-ए-मिलाद : २६ ऑगस्ट, रक्षाबंधन : २८ ऑगस्ट).
सप्टेंबर : (१४ सप्टेंबर : गणेश चतुर्थी, १८ सप्टेंबर : गौरी पूजन, २५ सप्टेंबर : अनंत चतुर्दशी).
ऑक्टोबर : (२ ऑक्टोबर : महात्मा गांधी जयंती, ११ ऑक्टोबर : घटस्थापना, २० ऑक्टोबर : दसरा).
नोव्हेंबर : (५ ते १७ नोव्हेंबर : दिवाळी सुट्टी, २४ नोव्हेंबर : गुरुनानक जयंती).
डिसेंबर : (२५ डिसेंबर : नाताळ).
जानेवारी : (७ जानेवारी : वेळ अमावस्या, १४ जानेवारी : भोगी, १५ जानेवारी : मकरसंक्रांत, २६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन).
फेब्रुवारी : (१९ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती).
मार्च : (६ मार्च : महाशिवरात्री, १० मार्च : रमजान ईद, २२ मार्च : धुलिवंदन, २६ मार्च : गुड फ्रायडे, २७ मार्च : रंगपंचमी).
एप्रिल : (७ एप्रिल : गुढीपाडवा, १४ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १५ एप्रिल : श्री राम नवमी, १८ एप्रिल : महावीर जयंती).
मे : (१ मे : महाराष्ट्र दिन).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.