

Latest Maharasthra News: ‘‘विधानसभेच्या निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच नाही. तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागावाटप होतील,’’ असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २० तारखेला वर्ध्यात येत आहेत. त्या नियोजनाच्या बैठकीसाठी जात असताना नागपूर विमानतळावर शनिवारी ते पत्रकारांशी बोलत होते. सामंत म्हणाले, ‘‘जागावाटपाबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांना सूत्रांकडून काही माहिती मिळाली असेल तर त्याबद्दल मला माहिती नाही. महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये बैठका झालेल्या आहेत. आमच्या तिकीट वाटपानंतर कुठलीच ‘ब्रेकिंग’ मिळणार नाही याची तजवीज महायुतीने केली आहे.’’