Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; ही आहेत नावे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

अदिती तटकरे (श्रीवर्धन), नवाब मलिक (अणुशक्तीनगर), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा), पृथ्वीराज साठे (केज) यांच्या नावांनंतर चंदगडमधून राजेश पाटील, पिंपरीतून सुलक्षणा शिलावंत, आष्टी बाळासाहेब आजबे, मोहोळ यशवंत माने, बागलाण दीपिका चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवार) आपली दुसरी यादी जाहीर केली असून, यामध्ये 20 उमेदवारांचा समावेश आहे. खेड-आळंदीतून दिलीप मोहीते, नांदगावमधून पंकज भुजबळ, मावळमधून सुनील शेळके, माढ्यातून बबनराव शिंदे, माळशिरसमधून उत्तम जानकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

राष्ट्रवादीने बुधवारी 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, बारामतीमधून अजित पवार, तर परळीतून धनंजय मुंडे यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. आता आज दुसरी यादी जाहीर झाली आहे.

Vidhan Sabha 2019 : गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे नतमस्तक; पंकजांविरुद्ध लढाई
 
अदिती तटकरे (श्रीवर्धन), नवाब मलिक (अणुशक्तीनगर), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा), पृथ्वीराज साठे (केज) यांच्या नावांनंतर चंदगडमधून राजेश पाटील, पिंपरीतून सुलक्षणा शिलावंत, आष्टी बाळासाहेब आजबे, मोहोळ यशवंत माने, बागलाण दीपिका चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजप-शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या यादीत या बंडखोरांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, पक्षातील निष्ठावंत घराणी व आजी-माजी आमदारांना उमेदवारी देत राष्ट्रवादीने नवे वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक तरुण व नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने त्यांनी भाजप व शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.  

दुसरी यादी
अभिषेक पाटील - जळगाव
संग्राम गावंडे - अकोला
प्रकाश डहाके - वाशिम
केवलराम काळे - अमरावती
धर्मरावबाबा आत्राम - गडचिरोली
मोहम्मद तारिक मो. शमी - यवतमाळ
मधुसुदन केंद्र - परभणी
संतोष कोल्हे - औरंगाबाद
पंकज भुजबळ - नांदगाव
दीपिका चव्हाण - बागलाण
सरोज अहिरे - देवळाली
सुरेश लाड - कर्जत
दिलीप मोहिते - खेड आळंदी
सुनील शेळके - मावळ
सुलक्षणा शिलावंत - पिंपरी
बाळासाहेब आजबे - आष्टी
बबनदादा शिंदे - माढा
यशवंत माने - मोहोळ
उत्तमराव जानकर - माळशिरस
राजेश पाटील - चंदगड

पहिली यादी 
संदीप बेडसे - सिंदखेडा (धुळे) 
जगदीश वळवी - चोपडा (जळगाव) 
पुष्पा ज्ञानेश्वर महाजन - जळगाव ग्रामीण 
अनिल भाईदास पाटील - अमळनेर 
डॉ. सतीश पाटील- एरंडोल 
राजीव देशमुख- चाळीसगाव 
दिलीप वाघ - पाचोरा 
संजय गरुड - जामनेर 
राजेंद्र शिंगणे - सिंदखेडराजा (बुलडाणा) 
रवीकुमार राठी - मूर्तिजापूर 
राजू तिमांडे - हिंगणघाट (वर्धा) 
अनिल देशमुख - काटोल (नागपूर) 
विजय घोडमारे - हिंगणा 
इंद्रनील मनोहर नाईक - पुसद (यवतमाळ) 
प्रदीप नाईक- किनवट (नांदेड) 
दिलीप शंकरअण्णा धोंडगे - लोहा 
चंद्रकांत नवघरे - वसमत (हिंगोली) 
विजय भांबळे - जिंतूर (परभणी) 
राजेश टोपे - घनसावंगी (जालना) 
बबलू चौधरी - बदनापूर 
चंद्रकांत दानवे - भोकरदन 
नितीन पवार - कळवण (नाशिक) 
छगन भुजबळ - येवला 
माणिकराव कोकाटे - सिन्नर 
दिलीप बनकर - निफाड 
नरहरी झिरवळ - दिंडोरी 
सुनील भुसारा - विक्रमगड 
दौलत दरोडा - शहापूर 
प्रमोद हिंदूराव - मुरबाड 
भरत गंगोत्री - उल्हासनगर 
प्रकाश तरे - कल्याण (पूर्व) 
जितेंद्र आव्हाड - मुंब्रा-कळवा 
धनंजय पिसाळ - विक्रोळी 
विद्या चव्हाण - दिंडोशी 
नबाव मलिक - अणुशक्तीनगर 
अदिती तटकरे - श्रीवर्धन 
अतुल बेनके - जुन्नर 
दिलीप पाटील - आंबेगाव 
अशोक पवार - शिरूर 
रमेश थोरात - दौंड 
दत्तात्रय भरणे - इंदापूर 
अजित पवार - बारामती 
सुनील टिंगरे - वडगाव शेरी 
सचिन दोडके - खडकवासला 
अश्विनी कदम - पर्वती 
चेतन तुपे - हडपसर 
किरण लहामटे - अकोले 
आशुतोष काळे - कोपरगाव 
प्रताप ढाकणे - शेवगाव 
नीलेश लंके - पारनेर 
संग्राम जगताप - नगर शहर 
रोहित पवार - कर्जत जामखेड 
विजयसिंह पंडित - गेवराई 
प्रकाश सोळंके - माजलगाव 
संदीप क्षीरसागर - बीड 
पृथ्वीराज साठे - केज 
धनंजय मुंडे - परळी 
बाबासाहेब पाटील - अहमदपूर 
संजय बनसोडे - उदगीर 
राहुल मोटे - परांडा 
भारत भालके - पंढरपूर 
दीपक चव्हाण - फलटण 
मकरंद पाटील - वाई 
शशिकांत शिंदे - कोरेगाव 
बाळासाहेब पाटील - कऱ्हाड उत्तर 
सत्यजित पाटणकर - पाटण 
दीपक पवार - सातारा 
संजय कदम - दापोली 
सहदेव बेटकर - गुहागर 
शेखर निकम - चिपळूण 
सुदेश मयेकर - रत्नागिरी 
बबन साळगावकर - सावंतवाडी 
के. पी. पाटील - राधानगरी 
हसन मुश्रीफ - कागल 
जयंत पाटील - इस्लामपूर 
मानसिंग नाईक - शिराळा 
सुमन पाटील - तासगाव-कवठे महांकाळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second list of NCP candidates released for Maharashtra vidhansabha elections 2019