बेळगावात आणखी एका पुतळ्याची विटंबना, 27 जणांना अटक

Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharajesakal
Summary

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेनंतर अनगोळात संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केलीय.

बेळगाव (कर्नाटक) : बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बेळगाव आणि परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाले असून शिवप्रेमी नागरिकांनी धर्मवीर संभाजी चौकात (Dharmaveer Sambhaji Chowk) जमून सर्व रस्ते बंद केले आहेत. तसेच या घटनेच्या विरोधात ठिकठिकाणी दगडफेक करण्यात आली असून रात्री धर्मवीर संभाजी चौकात पोलिसांच्या (Belgaum Police) गाडीवर दगडफेक करण्यात आलीय, तर रात्री काही अज्ञातांकडून क्रांतीवीर संगोळी रायण्णा (Krantiveera Sangolli Rayanna) यांच्या पुतळ्याचीही विटंबना झाल्याची माहिती आहे. क्रांतीवीरांच्या गळ्याभोवती लाल-पिवळा झेंडा गुंडाळला असून हात कापडाने बांधले आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj
शिवरायांचा अवमान; बेळगावात दगडफेक, आज शिवप्रेमींचा मोर्चा

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरण्या बरोबरच राजांच्या पुतळ्याला अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. गेल्या वर्षी मनगुत्ती येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात हटविण्यात आला होता. तेव्हापासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकण्याचे काम कन्नड संघटनांकडून केले जात आहे. गुरुवारी रात्री सदाशिनगर बंगळूर येथे शिवाजी राजांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून राजांचा अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिवप्रेमीमधून एकच संताप व्यक्त झाला. तसेच अनगोळ येथील संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केलीय. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्रीपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केले असून खबरदारी म्हणून शहर आणि तालुक्यात कलम 144 अनुसार जमावबंदीचा आदेश पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी जारी केला आहे.

बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याने याचे तीव्र पडसाद बेळगावात उमटले आहेत. शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत २० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याने खबरदारी म्हणून शहर आणि तालुक्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com