बेळगावात मराठी भाषिक संतप्त; शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ रास्ता रोको | Chhatrapati Shivaji Maharaj Statue | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

या घटनेचा निषेध करण्यासाठी हजारो शिवप्रेमी धर्मवीर संभाजी चौक येथे जमा झाले

शिवरायांचा अवमान; बेळगावात दगडफेक, आज शिवप्रेमींचा मोर्चा

बेळगाव : बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बेळगाव आणि परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाला असून शिवप्रेमी नागरिकांनी धर्मवीर संभाजी चौकात (Dharmaveer Sambhaji Maharaj Chowk) जमून सर्व रस्ते बंद केले. तसेच या घटनेच्या विरोधात ठिकठिकाणी दगडफेक करण्यात आली असून धर्मवीर संभाजी चौकात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. शनिवारी बेळगाव शहरात बंद सदृश्य वातावरण पाहावयास मिळणार असून शनिवारी सकाळी 10 वाजता शिवाजी उद्यानापासून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. (Belgaum Latest News In Marathi)

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) अपशब्द वापरण्या बरोबरच राजांच्या पुतळ्याला अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. गेल्या वर्षी मनगुत्ती येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात हटविण्यात आला होता. तेव्हापासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकण्याचे काम कन्नड संघटनांकडून केले जात आहे. गुरुवारी रात्री सदाशिनगर बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) काळा रंग ओतून महाराजांचा अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला.

या घटनेचा निषेध करण्यासाठी हजारो शिवप्रेमी धर्मवीर संभाजी चौक येथे जमा झाले. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी या भागातील सर्व रस्ते रोखून धरले तसेच समाजकंटकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांकडून शांत राहण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध करीत दगडफेक करण्यास सुरुवात केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याची घटना समोर आल्यानंतर बेळगावात वाहनांची तोडफोड करण्यात आली. (Chhatrapati Shivaji Maharaj statue Belgaum News)

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याची घटना समोर आल्यानंतर बेळगावात वाहनांची तोडफोड करण्यात आली. (Chhatrapati Shivaji Maharaj statue Belgaum News)

दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून या घटनेचे पडसाद शनिवारी दिवसभर उमटण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे शहराच्या विविध भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा: समाजकंटकांकडून बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आवाहन केल्यानंतर घरी जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे धर्मवीर संभाजी चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आणि इतर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इतर भागातही दगडफेक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम आमटे व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी धर्मवीर संभाजी चौक येथे ठाण मांडून बसलेल्या श्रीराम सेना हिंदुस्तान चे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर सरिता पाटील, प्रकाश शिरोळकर यांच्यासह इतर कार्यकर्त्याशी चर्चा केली.

धर्मवीर संभाजी चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आणि इतर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते (Chhatrapati Shivaji Maharaj statue Belgaum News)

धर्मवीर संभाजी चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आणि इतर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते (Chhatrapati Shivaji Maharaj statue Belgaum News)

बेळगाव जिल्ह्यातील गावांमध्येही पडसाद

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले असून अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली आहे. तसेच शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास सरकारलागंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने येळ्ळूर, हिंडलगा, मच्छे, पिरणवाडीसह विविध गावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे मात्र अशाच प्रकारे मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार सर्व गावांमधून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Marathi Language Day