महाराष्ट्रातील कोरोना निर्बंधाची जिल्ह्यानुसार माहिती एका क्लिकवर

See district  wise information on corona restrictions in Maharashtra
See district  wise information on corona restrictions in Maharashtra
Updated on

पुणे : राज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकारने सुध्दा राज्यातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्य सरकारला वेगाने पाऊले उचलून योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी कोरोनाची लस घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना लसीचा कोणताही दुष्परिणाम नसून पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने लस घेण्याचा सल्ला महाराष्ट्रातील जनतेला दिला. तसेच आवश्यकतेनुसार जिल्ह्यांनुसार कडक टाळेबंदीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

मुंबई : मुंबई- मुंबई जिथे रुग्णसंख्या जास्त आहे तिथे अंशता लॉकडाऊन आहे. 

पुणे : पुणे शहर आणि संपुर्ण जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंध ठरवण्यासाठी आज बैठक ठरवणार आहेत व नवीन नियमावली जाहीर होणार आहे.

ठाणे : ठाण्यामध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन असला तरी जिथे कोरोणा रुग्ण जास्त सापडले आहेत. अश्याच परिसरामध्ये हा लॉकडाऊन आहे. तसेच एकूण  16 ठिकाणांवर हॉटस्पॉट जाहीर केला आहे.

नाशिक :विकेंडला लॉकडाऊन आहे तर इतर दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंतच बाहेर जायला परवानगी आहे. तसेच 7 च्या नंतर बाहेर जाण्यास निर्बंध आहेत.

जळगाव : जिल्‍ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभुमीवर जळगाव शहरात १२ ते १४ मार्च या तीन दिवसाकरीता जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याचा आज पहिला दिवस आहे. तसेच चोपडा येथे देखील उद्यापासून (ता.१३) दोन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

धुळे : धुळ्यात देखील गेल्‍या दोन दिवसांपासून कोरोनाचा विस्‍फोट सुरू आहे. या पार्श्वभुमीवर संपुर्ण धुळे जिल्‍ह्यात ६० तासांचा जनता कर्फ्यू लावण्यात येत आहे. याची सुरवात रविवारी (ता.१४) सायंकाळपासून करण्यात येत आहे.

नांदेड : जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन लावण्यात आला असून सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत शहर व जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू. लॉकडाऊनचे कडक नियम पाळा, पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन.

परभणी : जिल्ह्यात लॉकडाऊन नाही, परंतु व्यापाऱ्यांची आरटी -पीसीआर तपासणी सुरू, जनजीवन सुरळीत आहे.

हिंगोली : जिल्ह्यात मागील आठवड्यात लावलेले लॉकडाऊन उठविले. सध्या व्यापाऱ्यांची आरटी -पीसीआर तपासणी सुरू. रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे.

बीड : दोन दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल : जिल्हाधिकारी 

जालना: जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन. रात्री ७ ते ७ दुकाने बंद. हॉटेल, ढाबे, चहाचे हॉटेल, व्यायामशाळा ३१ पर्यंत बंद.

औरंगाबाद : ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान अंशतः लॉकडाऊन (रात्री ९ ते सकाळी ६). शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन.

उस्मानाबाद : संध्याकाळी ९ ते ५ संचारबंदी. दर रविवारी जनता कर्फ्यू 

लातूर : रात्री ११ ते सकाळी ६ संचारबंदी. महापालिका नागरिकांच्या तोंडावर मास्क नसणाऱ्यांवर कारवाई करत आहे.

यवतमाळ : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. तसेच सकाळी ९ ते ५ या वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नागपूर : नागपुरात १५ ते २१ मार्च या दरम्यान लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेसह शासकीय व निमशासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीसह सुरू राहतील. 

अमरावती : अमरावतीत देखील नाईट कर्फ्यु लावण्यात आला असून सकाळी ९ ते ४ या वेळेत सर्वच दुकाने सुरू आहेत.

वर्धा : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वर्धेतून बाहेर जाणाऱ्या सर्व बसेस बंद आहेत. तसेच सकाळी ८ ते रात्री ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून रविवार मात्र कडक लॉकडाऊन पाळले जात आहे. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

अकोला : कोरोनामुळे सकाळी ९ ते ५ या वेळेत सर्व दुकान सुरू आहेत. त्यानंतर फक्त मेडीकल आणि रुग्णालये सुरू. शनिवार आणि रविवारी पूर्ण बंद.

बुलडाणा : नाईट कर्फ्यु  लावण्यात आला असून सकाळी ९ ते ५ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

वाशिम : रात्री संचारबंदी असून सकाळी ९ ते ५ या वेळेत दुकाने सुरू. तसेच रविवारी कडक लॉकडाउन.

अहमदनगर : जिल्ह्यात सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास मुभा आहे. रात्री नऊ वाजल्यापासून सकाळी नऊपर्यंत संचारबंदी आहे. लग्न समारंभातही ५०पेक्षा जास्त वऱ्हाडींना मुभा नाही. शाळांमध्ये विद्यार्थी कोरोनाबाधित होत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. जिल्ह्यातील शाळा बंद करायच्या की नाही याबाबत ही समिती निर्णय देणार आहे.

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे रात्री 11 ते सकाळी सहा या वेळेत संचात बंदी लागू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी एकत्र येण्यास मज्जाव आहे. शिवाय सण समारंभ यांच्यावर निर्बंध असून 50 लोकांची मर्यादा घालून दिली आहे. जिल्ह्यातील आठवडे बाजार आणि गर्दीच्या परिसरात जमावबंदी आहे. मंदिरात प्रवेश न देता बाहेरून दर्शन घेतले जात आहे. 

सिंधुदुर्ग : येथे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. मात्र प्रशासनाच्या आदेशानुसार लोकांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर योग्य त्या गोष्टींची खबरदारी घेतली जात आहे. 

सांगली : कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोक जमन्यावर निर्बंध आहेत. मात्र सण समारंभासाठी फक्त 25 लोकांची मर्यादा घातली आहे. इतर बाजारपेठ सुरळीत सुरू असून मोर्चा आणि आंदोलने याला बंदी आहे 

कोल्हापूर-बेळगाव : या दोन्ही जिल्हयात कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. त्यामुळे शासनाने कोणतेही निर्बंध घातलेलं नाहीत. प्रशासनाच्या आदेशानुसार कोरोनाचे नियम आणि अटींचे पालन केले जात आहे.

सातारा :  जिल्ह्यात रात्री अकरा ते पहाटे सहा संचारबंदी आहे. सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत दुकाने सुरु राहणार (मेडिकल वगळून). शाळा व कनिष्ठ महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत.  लग्न समारंभासाठी केवळ 50 लाेकांची उपस्थिती हवी.

सोलापूर : जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com