आजचा शनिवार ठरणार ऐतिहासिक! का ते पहा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मुंबई - राज्यातील सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी १५ फेब्रुवारीचा म्हणजे आजचा शनिवार हा ऐतिहासिक ठरणार आहे. यानंतर कोणत्याही शनिवारी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांना कार्यालयात यावे लागणार नाही. पाच दिवसांचा आठवडा या निर्णयाची अंमलबजावणी येत्या २९ फेब्रुवारीपासून होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सरकारी कार्यालयाला सुटी असते. फेब्रुवारी हा महिना २९ दिवसांचा आहे. त्यामुळे या महिन्यात पाच शनिवार येत असले तरी या निर्णयांची अंमलबजावणी २९ फेब्रुवारीपासून होणार आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी येणारा शनिवार हा सरकरी अधिकारी-कर्मचारी यांच्या आयुष्यातील सरकारी कार्यालयातील शेवटचा ठरणार आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी येणारा शनिवार हा कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

मुजरा! मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय 'हा' टिकटाॅक व्हिडिओ; तुम्ही पाहिलात का? 

मंत्रालयासह राज्यातील क्षेत्रिय कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा करावा, ही मागणी मागील आठ-दहा वर्षांपासून अधिकारी-कर्मचारी यांच्या संघटनांची होती. मात्र या मागणीला मागील दहा वर्षांत बैठकांच्या गुऱ्हाळाशिवाय कोणतेही यश आले नव्हते. मात्र, शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका फटक्‍यात हा निर्णय घेऊन राज्यातील १७ लाख सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना खूष केले. संवग निर्णय, लोकप्रिय निर्णय हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन निवडणुकांच्या तोंडावर घेतले जातात. मात्र नजिकच्या काळात कोणतीही निवडणूक नसताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याने नोकरशाहीत आनंदाचे वातावरण आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See if Saturday February 15 is going to be historic