जमिनीचा फेरफार पहा घरच्या घरी, अशी करा प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

See the land change transcript at home, do the process

फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणाही जमीन मालकाला फेरफारमधील नोंदी आता घरबसल्या पाहता येतील. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्याने जरी काही मेख मारली असेल किंवा फसवणूक झाली असेल तर ती आपल्याला तपासता येईल. ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

जमिनीचा फेरफार पहा घरच्या घरी, अशी करा प्रक्रिया

नगर ः सात-बारा उतारा शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच महत्त्वाचा असतो. दुसरा महत्त्वाचा दस्तावेज म्हणजे आठ अ हा होय. या दोघांच्या जोडीला असतो तो फेरफार.

फेरफार उताऱ्यावरून जमिनीचा, त्या प्लॉटचा प्रवास तपासता येतो. थोडक्यात संबंधित जागेची ती कुंडलीच असते.त्याला गावनमुना - ६ असेही म्हटले जाते. जमीन कोणाच्या नावावरून कोणाकडे गेली. याची फेरफारच्या उताऱ्यात नोंद असते. संबंधित जमीन मालकाने जर एखाद्या बँकेचे किंवा पतपेढीचे कर्ज घेतले असेल तर ते संबंधित उताऱ्यावर नोंदवले जाते. 

जागेच्या किंवा जमिनीच्या मालकास आपल्या वारसाच्या नोंदी लावायच्या असतील तर त्या फेरफारात नोंदवल्या जातात. त्यामुळे जमीन खरेदी करताना फेरफारच्या नोंदी फार महत्त्वाच्या असतात. काहीजण दुसऱ्याच्या नावे खरेदी देऊन फसवणूकही करतात. फेरफारच्या नोंदी व्हायला किमान तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. ती नोंद व्हायच्या आत व्यवहार झाला असल्यास हमखास फसवणूक होऊ शकते. त्यामुळे हा उतारा अत्यंत महत्त्वाचा आहे. 

हेही वाचा - मंत्री थोरात म्हणाले, कोरोनाचा हा तिसरा प्रहर

ही फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणाही जमीन मालकाला फेरफारमधील नोंदी आता घरबसल्या पाहता येतील. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्याने जरी काही मेख मारली असेल किंवा फसवणूक झाली असेल तर ती आपल्याला तपासता येईल. ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

असा पाहता येईल फेरफार

सरकारच्या महसूल विभागाने ही सोय केली आहे.bhulekh.mahabhumi.gov.in गुगलवर या नावाने सर्च दिल्यानंतर महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल. या पेजवर महाराष्ट्रातील जिल्हे दिसतील. त्यात तालुक्याचा पर्याय आहे. त्यातच गावाचाही रकाना आहे. हा डिजीटल फॉर्म भरल्यानंतर आपली चावडी या नावावर क्लिक करायचं. ते ओपन झाल्यानंतर फेरफाराच्या नोंदी दिसू लागतील. त्यात गट नंबर, सर्वेनंबर असतो. फेरफार केलेला मजकूर, तो कोणत्या तारखेला केला आहे, याची नोंद असते.

एकंदरीत फेरफार नंबर, फेरफाराचा प्रकार,फेरफाराचा दिनांक, हरकत नोंदवण्याची तारीख, सर्वे किंवा गट क्रमांक अशा प्रकारात तो विभागला जातो. कोणी हरकत घेतली असेल तर नोंद होत नाही. कोणाची हरकत नसेल तर नोंद सर्टिफाईड होते.

संपादन - अशोक निंबाळकर

Web Title: See Land Change Transcript Home Do Process

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BankPisces Horoscope