राज्यातील तीन प्लॅटफार्मची ‘यंग चेंजमेकर्स’मध्ये निवड

‘अशोका इनोव्हेटर्स फॉर द पब्लिक’ हे सामाजिक उद्योजक आणि चेंजमेकर्सचे जगातील एक मोठे नेटवर्क आहे.
ashoka innovators for the public
ashoka innovators for the publicsakal
Summary

‘अशोका इनोव्हेटर्स फॉर द पब्लिक’ हे सामाजिक उद्योजक आणि चेंजमेकर्सचे जगातील एक मोठे नेटवर्क आहे.

पुणे - तरुणांनी स्थापन केलेली एनजीओ, सामाजिक उपक्रम आणि स्टार्टअपला बूस्टर मिळावा म्हणून त्यांना नेटवर्किंग, फंडिंग यासह विविध बाबींचे मार्गदर्शन आणि सल्लागार उपलब्ध करून देत एक वर्ष इनक्युबेशन पुरविणाऱ्या ‘अशोका यंग चेंजमेकर्स’मध्ये राज्यातील तीन स्टार्टअपची निवड झाली आहे. त्यातील एक स्टार्टअप पुण्यातील आहे.

‘अशोका इनोव्हेटर्स फॉर द पब्लिक’ हे सामाजिक उद्योजक आणि चेंजमेकर्सचे जगातील एक मोठे नेटवर्क आहे. त्यात ‘अशोका यंग चेंजमेकर्स’च्या तिसऱ्या आवृत्तीत देशातील एकूण १३ चेंजमेकर्स म्हणजे तरुणांचे विविध उपक्रम निवडले गेले आहेत. निवडण्यात आलेले उपक्रम हे मानसिक आरोग्य, आर्थिक साक्षरता, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, दळणवळण, आरोग्यसेवा कला आणि संस्कृती यामधील विविध समस्यांना हाताळत त्यातून समस्या दूर करीत आहेत. संगम इंडिया (पुणे), इम्पॉवर (मुंबर्इ) आणि फन लर्निंग यूथ (जळगाव) अशी राज्यातून निवड झालेल्या उपक्रमांची नावे आहेत.

निवड झालेल्या प्लॉटफार्मला काय मिळणार?

- नेटवर्किंग व फंडिंगबाबत मार्गदर्शन

- विविध बाबतीत सल्ला देणार तज्ज्ञ सल्लागार

- एक वर्ष इनक्युबेशन

- अशोकाच्या चर्चासत्रात सहभागी होता येणार

एम्पॉवर -

तरुणांना त्यांची सर्जनशीलता बदलण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने भाग्यश्री प्रभुतेंदोलकर यांनी या मासिकाची सुरवात केली.

हे एक व्यासपीठ आहे जिथे तरुण लोक राष्ट्रीयता, वंश, संस्कृती किंवा लिंग यांच्या अडथळ्यांशिवाय त्यांच्या हृदयाच्या जवळच्या आणि प्रिय समस्यांशी संवाद साधू शकतात. या मासिकाने ११ आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. ८० हून अधिक देशांमध्ये मासिकाची वाचकसंख्या चार हजाराहून अधिक आहे.

फन लर्निंग यूथ -

कलश भैया यांनी स्थापन केलेले ही एक एनजीओ आहे जी सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणांना सहभागी करते. त्यातून वंचित मुलांना शिक्षणात मदत होते आणि त्यात सहभागी व्यक्तींना व्यवस्थापन आणि बदल घडवून आणण्याचे कौशल्य मिळतात. फन लर्निंग युथने देशभरात आतापर्यंत ७०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि आता औपचारिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पुनर्नोंदणी आणि पारंपारिक शालेय शिक्षण प्रणालींमध्ये जबाबदारी वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

संगम इंडिया -

सुहानी धडफळे यांनी ‘संगम इंडिया’च्या माध्यमातून स्थानिक कलाकार, उद्योजक आणि सर्जनशील विचारांना सक्षम करण्यासाठी एक स्टार्टअप स्थापन केले आहे. ज्यामध्ये ते त्यांचे कौशल्य दाखवू शकतात, त्यांचा व्यवसाय वाढवू शकतात आणि त्यांच्या भविष्यातील सहयोगींना भेटू शकतात. १४-२४ वर्षे वयोगटातील ४० लोकांच्या टीमसह या प्लॅटफॉर्मवर देशव्यापी समुदायातील शेकडो कलाकार सदस्य आहेत.

काय आहे ‘अशोका’?

१९८१ मध्ये बिल ड्रेटन यांनी स्थापन केलेली ‘अशोका’ हे जगातील आघाडीच्या सामाजिक उद्योजकांचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. ज्यात ९३ देशांमध्ये चार हजारहून अधिक सामाजिक उद्योजकांसह चेंजमेकर आहेत. मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडवून आणणे हा आशोकाचा उद्देश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com