esakal | Video : सेनेच्या मंत्र्याचा माेदी सरकारवर आराेप; सापत्न वागणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Video : सेनेच्या मंत्र्याचा माेदी सरकारवर आराेप; सापत्न वागणूक

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात पुन्हा पाच दिवस कडक व पाच दिवस अंशतः लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याचे पालकमंत्री  बाळासाहेब पाटील यांनी नमूद केले.

Video : सेनेच्या मंत्र्याचा माेदी सरकारवर आराेप; सापत्न वागणूक

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड :  कराच्या रूपात मुंबईसह राज्याकडून केंद्राला मोठ्या प्रमाणात कर केंद्राला देते. मात्र, राज्यावर कोरोनाचे मोठे संकट असतानाही इतर राज्यांच्या तुलनेत केंद्र सरकारकडून अपेक्षित आर्थिक मदत मिळत नाही. राज्याच्या हक्काचा येणे असलेला निधीही मिळताना विलंब होत आहे, असा आरोप अर्थ व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज (रविवार) येथे केला.
कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सरकारचा हिरवा कंदील
 
येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, श्री. देसाई यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, ""मुंबईसह महाराष्ट्रातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात कराच्या रूपाने रक्कम देते. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्याला जादा निधी मिळाला पाहिजे होता. हा निधी मिळायला उशीर होत आहे. केंद्राकडून आमचे जे हक्काचे येणं आहे, राज्याचा जो वाटा आहे, तोही मिळताना विलंब होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्राला कर रूपाने जे उत्पन्न दिले आहे, त्याचा विचार करून इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला जादा मदत देण्याची गरज आहे.''

नळावरुन, शेताच्या बांध्यावरुन नव्हे तर चक्क पतंग उडविण्यावरुन झाली येथे दोन कुटुंबात मारामारी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात पुन्हा पाच दिवस कडक व पाच दिवस अंशतः लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याचे सांगून बाळासाहेब पाटील म्हणाले, ""जनतेने चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे. जनतेनेच पुढाकार घेतल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळेल, तर जिल्ह्यात मृत्यूदर वाढत आहे. वेळेत उपचार घेतले तर हा धोकाही टाळता येऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवरही नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.'' 
संपादन : सिद्धार्थ लाटकर