
यावर आज संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे.
उद्या बहुमत चाचणी होणार का? सेनेच्या आव्हानावर सुप्रिम कोर्टात तात्काळ सुनावणी
सध्या राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस अनेक बदल होत आहेत. सत्तास्थापनेसाठी भाजपाच्या हालचाली वाढल्या असल्याचे चित्र दिसत आहे. (maharashtra politics) दरम्यान, उद्या विधानसभेत बहुमत चाचणी घेऊन महाविकासआघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निर्देशाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर आज संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे. (Court challenging the Governor koshyari direction)
हेही वाचा: Maharashtra Politics : सत्तास्थापनेचा वेग राफेलपेक्षा जास्त - राऊत
महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात येण्याची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत. भाजपाने आता या राजकीय गोंधळात थेट एन्ट्री घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावी या मागणीसाठी आम्ही राज्यपालांकडे गेलो असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यांनी सरकारच्या बहुमत चाचणीचं पत्रही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं आहे. त्यामुळे आता राज्यपालांच्या भूमिकेवर ठाकरे सरकारचं भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, आता सेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
हेही वाचा: UP : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, बापाला जन्मठेपेची शिक्षा
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर ८ दिवसांनी भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेट घेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र पाठवून २४ तासात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी विशेष अधिवेशन ३० तारखेला बोलावण्यात येणार आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी दिलेली वेळ हा अन्याय असून भारतीय संविधानाची खिल्ली उडवली जात असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
Web Title: Sena Whip Sunil Prabhu Files Application Supreme Court Challenging Governor Koshyari Direction Majority
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..