वीज बिलात घोळ होतोय? मग रिडिंगसाठी अशी करा आयडिया

Electric Meter Reading
Electric Meter ReadingSakal
Updated on
Summary

लॉकडाउनमध्ये मीटर रिडिंग घेतले जात नसल्याने एकाच महिन्यात बिल आले. त्यानंतर महावितरणने समान हप्ते पाडून दिले. तरीही लोकांच्या शंका मिटल्या नाही.

अहमदनगर : मागील लॉकडाउनच्या काळात ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल आले. भारतीय जनता पक्षाने त्यासाठी आंदोलनही केले. परंतु सरकारने एक रूपयाही बिल कमी केले नाही. कोरोना काळात लोकं बेरोजगार होतात. त्यामुळे किमान त्या काळातील तरी बिल कमी झाले पाहिजे, अशी लोकांची मागणी होते.

लॉकडाउनमध्ये मीटर रिडिंग घेतले जात नसल्याने एकाच महिन्यात बिल आले. त्यानंतर महावितरणने समान हप्ते पाडून दिले. तरीही लोकांच्या शंका मिटल्या नाही. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये ग्राहकांनाच रिडिंग पाठविण्याचे आवाहन केलं आहे.(Send power meter readings to MSEDCL manually)

Electric Meter Reading
शेजाऱ्याने शेतरस्ता अडवला असेल तर साधा अर्ज करील काम तमाम

स्वतःहून मीटरचे रिडींग पाठविण्यास महावितरणच्या वीजग्राहकांकडून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. नाशिक परिमंडलात गेल्या एप्रिल महिन्यात २२,३३० ग्राहकांनी मोबाईल अँप, वेबसाईट व ‘एसएमएस’द्वारे मीटरचे रिडिंग महावितरणकडे पाठविले होते. तर मे महिन्यात यामध्ये आठ हजारांनी वाढ झाली. नाशिक परिमंडलातील ३०,१४२ वीजग्राहकांमध्ये अहमदनगर मंडळातील १५ हजार ५२८ ग्राहकांचा समावेश झाला आहे.

वीजग्राहकांना विविध प्रकारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोय कायम ठेवण्यासोबतच मीटर रिडींग पाठविण्याची मुदतदेखील चार दिवस करण्यात आली. दरम्यान कोरोना प्रादूर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्याची खास सोय उपलब्ध आहे.

याआधी नाशिक परिमंडळात मागील एप्रिल महिन्यात २२,३३० ग्राहकांनी मीटर रिडींग पाठविले. या ग्राहकांमध्ये मे महिन्यात जवळपास ४० टक्के संख्येने म्हणजे ८ हजाराने वाढ झाली.

प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येते. ग्राहकांना मीटरच्या रिडींगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवसआधी रिडींग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अँप, www.mahadiscom.in किंवा ‘एसएमएस’द्वारे मीटरमधील केडब्लूएच (kWh)रिडींग पाठविता येते.

असे पाठवा रिडिंग

महावितरण मोबाईल अँपमध्ये ‘सबमीट मीटर रिडींग’वर क्लिक करून मीटरमधील केडब्लूएच (kWh) रिडींगचा (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा व सबमीट करावे. तसेच ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करून www.mahadiscom.in वेबसाईटवरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करता येईल. यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्यासाठी MREAD<स्पेस><12 अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस><KWH रिडींग 8 अंकापर्यंत> असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास मीटर रिडींग सबमीट करता येईल.

ग्राहकांचे मीटरकडे लक्ष राहील

वीजग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविल्यास मीटरकडे व रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल.

महावितरणचा व्हिडिओ पहा

रिडिंग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. मीटर रिडींग कसे पाठवावे, याबाबत महावितरणच्या तसेच इतर सामाजिक माध्यमावर प्रात्यक्षिकासह व्हिडिओ उपलब्ध आहेत. विविध फायद्यांमुळे या सुविधेचा वापर करून वीजग्राहकांनी दरमहा मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.(Send power meter readings to MSEDCL manually)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com