होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणं गुन्हा नाही - कोर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court
होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणं गुन्हा नाही - कोर्ट

होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणं गुन्हा नाही - कोर्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी पोलीसांकडे येत असतात. अशीच काही प्रकरणं न्यायालयात गेल्यानंतर न्यायालय काही महत्वाची निरीक्षणं नोंदवत असतं. अशाच प्रकरणात मुंबईच्या सत्र न्यायालयाने एका ३६ वर्षीय आरोपीला तब्बल ११ वर्षांनी निर्दोष मुक्त केलं आहे. लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा या व्यक्तीवर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने एक महत्वाची टीपण्णी केली आहे.

न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना स्पष्ट केलं की, होणाऱ्या पत्नीला काही आक्षेपार्ह मेसेज पाठवणे हे तिच्याशी असभ्य वर्तन होऊ शकत नाही. त्यामुळे जवळपास ११ वर्षांपासून तुरूंगात असलेल्या या व्यक्तीची सुटका होऊ शकली आहे. विवाहपूर्व काळात एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी अशा पद्धतीचं संभाषण होत असतं असं यावेळी कोर्टाने सांगितलं. लैंगिक भावना जागृत करण्यासाठी आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीचा संवाद दुसऱ्या व्यक्तीला एखाद्यावेळी पटणार नाही, मात्र याचा अर्थ असा नाही की, ते त्या व्यक्तीशी असभ्य वर्तन आहे.

हेही वाचा: तंबाखूचे सेवन, चुलीवरील स्वयंपाकामुळे COPD चा धोका वाढला

महिलेने २०२० मध्ये तक्रार केली होती. हे जोडपं २००७ मध्ये मॅट्रिमोनिअल साइटवर भेटले होते. घरच्यांचा विरोध असतानाही त्यांनी लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीची आई या लग्नाच्या विरोधात होती. लग्नानंतर तुम्हाला घरात राहू देणार नाही असं त्याच्या आईने सांगितल्यामुळे २०१० मध्ये त्यांनी संबंध संपवले. दरम्यान, बलात्काराच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने सांगितले की, लग्न करण्याच्या प्रत्येक वचनाचं पालन न करण्याला फसवणूक किंवा बलात्कार म्हणता येणार नाही.

loading image
go to top