
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची 84 व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. मधुकरराव पिचड यांची आदिवासी समाजाचा नेता म्हणून ओळख होती. त्यांनी अनेक वर्षे आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. यामुळे आदिवासी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. दिड महिन्यांआधी मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक आला होता. यामुळे त्यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता त्यांचे निधन झाल्याचे बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधुकर पिचड यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जाते. याचं कारण म्हणजे त्यांची मनाला भावणारी कारकीर्द... गावाला रोजगार मिळावा यासाठी सुरू केलेली दूध संस्था... नंतर तीच गावासाठी मोठं साधन बनली. यापासून सुरू झालेला मधुकर पिचड यांचा प्रवास त्यांना मंत्रीपदापर्यंत घेऊन गेला आहे.