

Rajesh Agrawal
esakal
मुंबई: भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे ३० नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर एक डिसेंबरपासून अग्रवाल हे मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. अग्रवाल हे १९८९ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत.