
सोलापूर: संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या आगळ्यावेगळ्या विनोदी शैलीतील कीर्तनांनी मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ कीर्तनकार, समाजप्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे प्रचारक ह. भ. प. विनोदाचार्य मधुकर महाराज गिरी यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे वय 95 वर्षे होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.