
गडचिरोली: मागील काही वर्षांपासून जराजर्जर झालेल्या माओवादी चळवळीला त्यांच्या इतिहासातील सर्वांत मोठा धक्का बसला असून दीर्घकाळ माओवादी चळवळीत सक्रिय राहून पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीपर्यंत पोहोचलेला वरिष्ठ माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याने अखेर आपल्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर विविध राज्यांत मिळून दहा कोटींहून अधिक बक्षीस होते. गुरुवार (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो शस्त्र खाली ठेवून शरण येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.