'आमदार फुटू नये म्हणून आणखी 5 कोटी दिले'; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट: Eknath Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde: 'आमदार फुटू नये म्हणून आणखी 5 कोटी दिले'; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर त्यांनी आणि समर्थक आमदार यांच्यासह भाजपसोबत युती केली. त्यानंतर त्यांनी 50 खोके घेतले असल्याची टीका केली जाते. अशातच आता ठाकरे गटाच्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदार सध्या मंत्रीपद न मिळण्यामुळे अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. तर ते फुटू नयेत म्हणून या आमदारांना पुन्हा एकदा प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरेंनी केला आहे.

यासंबधीची माहिती एका उद्योगपतीनेच आपल्याला दिल्याचा दावाही चंद्रकांत खैरेंनी केला आहे. खैरे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रकांत खैरे माध्यमांशी संवाद साधत होते. बोलताना ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारला शिवाजी महाराजांविषयी आस्था नाही. तर शेतकऱ्यांबद्दल कळवळा नाही. केवळ आमदार पकडून ठेवायचे. त्यांना खोके द्यायचे एवढंच सुरू आहे. आताही त्यांनी काही आमदारांना पकडून ठेवलं आहे.

हे ही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....


शेतकऱ्यांकडे या सरकारने दुर्लक्ष केलं आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. वीज बिल थकल्यामुळे त्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी तणावाखाली आहेत. त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका म्हणून आवाहन केलं आहे.

हेही वाचा: Uddhav Thackery: "उद्धव ठाकरेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे"