esakal | रश्मी शुक्लांसह एका पोलिस अधीक्षकांविरोधात गंभीर आरोप, अमरावती पोलिसांत तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

rashmi shukla

रश्मी शुक्लांसह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पदाचा दुरुपयोग करून खोटी प्राथमिक चौकशी बसविणे, चौकशी अधिकाऱ्याविरुद्ध दबाव टाकणे, खासगी आयुष्यात गोपनीयतेचा भंग करण्यासह इतरही गंभीर स्वरूपाचे काम राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला (rashmi shukla) व अमरावतीचे पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. (amravati sp dr haribalaji N.) यांनी केले, अशी तक्रार पोलिस आयुक्तालयात (amravati police) कार्यरत वरिष्ठ लघुलेखकाने गाडगेनगर पोलिस ठाण्यात केली आहे. (senior shorthand writer filed complaint against rashmi shukla and amravati sp)

हेही वाचा: रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी : मेडिकलचे मुख्यप्रवेशद्वार बंद

देवानंद भोजे, असे आरोप करणाऱ्या लघुलेखकाचे नाव असून, त्याने १८ जून रोजी ही तक्रार दिली. त्यात संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. नमूद दोन अधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षक कार्यालयातील लघुलेखक व टंकलेखक जगदीश देशमुख, पोलिस शिपाई रूपेश पाटील, किशोर शेंडे यांच्यासह अन्य पाच, असे एकूण ११ जण या कटात सहभागी असल्याचा आरोप भोजे यांनी केला.

पोलिस आयुक्तालयात रुजू होण्यापूर्वी देवानंद भोजे हे पोलिस अधीक्षक कार्यालयात त्याच पदावर कार्यरत असताना हा प्रकार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी गोपनीयतेचा भंग केला, इंडियन टेलिग्राफ कायद्याचे उल्लंघन केले, स्वत:ची व कुटुंबाची बदनामी केली, नोकरीतून काढून टाकण्याची धमकी दिली, फोन टॅपिंग करणे, शारीरिक व मानसिक छळ करण्याचा आरोप भोजे यांनी केला. भोजे यांनी गाडगेनगर ठाण्यात नोंदविलेली तक्रार एकूण १८ पानांची आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

loading image