esakal | मेडिकलचे मुख्यप्रवेशद्वार बंद; आता इथून मिळणार प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी : मेडिकलचे मुख्यप्रवेशद्वार बंद

रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी : मेडिकलचे मुख्यप्रवेशद्वार बंद

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाच्या काळात मेडिकलमध्ये (Government Medical College and Hospital) वाहने चोरी होण्यापासून तर तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तिसऱ्या माळ्यावरून होणाऱ्या आत्महत्यांची प्रकरणे वाढीस लागली आहेत. त्यातच रुग्णांकडून खुद्द सुरक्षारक्षकांनी चिरीमिरी घेतल्याचे प्रकरणही मे महिन्यात उजेडात आले. यामुळे मेडिकल-सुपरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह (Question mark over the safety of super hospital and Medical hospital) निर्माण झाले. अखेर मेडिकल प्रशासनाने येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. विशेष असे की, मुख्य प्रवेशद्वार बंद केले. (Tight-security-arrangements-in-medical)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (मेडिकल) वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टरांची वाहने चोरीला गेल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत. त्याच अनेक कर्मचाऱ्यांच्या सायकल चोरीला गेल्या आहेत. दर दिवसाला मेडिकलमध्ये पंधरा ते वीस हजार लोकांचा वावर असतो. यामुळे अशा घटनांवर अंकुश लावणे मेडिकल प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

हेही वाचा: कोविडनंतर लैंगिकविकाराची समस्या; वाचा काय सांगतात डॉ. चक्करवार

काही दिवसांपूर्वी प्रशासनाने पार्किंगमध्ये नसलेले वाहन वाहतूक पोलिसांकडून उचलण्यात येत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता. याशिवाय मेडिकलच्या प्रसूती वॉर्डातून सुरक्षारक्षक तैनात असताना बाळ चोरीची घटना देखील घडली होती. मारहाणीच्या अनेक घटना घडत असताना येथील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात आहेत. महाराष्ट्र सुरक्षा बलातर्फे ही सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सुमारे दीडशेवर सुरक्षा रक्षक मेडिकलच्या सुरक्षेवर नजर ठेवून आहेत, हे विशेष.

राजाबाक्षासमोरील प्रवेशद्वारातून मिळणार प्रवेश

मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तातडीने सोडण्यात येते, मात्र सोबत असणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण राखण्यात येते. सद्या साऱ्यांसाठी सुपर स्पेशालिटी ते राजाबाक्षा हा आमरस्ता झाल्याने सारेच या रस्त्यावरून येत होते. मात्र यापुढे सुपरमधून येणाऱ्यांना सुपर आणि मेडिकलच्या अंतर्गत भागातील प्रवेशद्वारावर रोखण्यात येईल. तर ऐतिहासिक असे मेडिकलचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यामुळे राजाबाक्षा समोरच्या एकाच प्रवेशद्वारातून रुग्ण, नातेवाईकांना मेडिकलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

loading image