पीडितांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र व्यवस्था हवी - गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे शारीरिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या सचिन पाटील ऊर्फ सचिन सांबरे याच्या विरोधात मुलींना तक्रार करण्यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातच स्वतंत्र व्यवस्था उभारण्याची सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला पोलिस अधिकारी देण्याची सूचनाही त्यांनी केली.

मुंबई - तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे शारीरिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या सचिन पाटील ऊर्फ सचिन सांबरे याच्या विरोधात मुलींना तक्रार करण्यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातच स्वतंत्र व्यवस्था उभारण्याची सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला पोलिस अधिकारी देण्याची सूचनाही त्यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. गोऱ्हे यांनी आज नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार व झोन एकचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. आधुनिक लखोबा लोखंडेकडून फसवले गेल्याचे जवळपास ३० मुलींनी पोलिस तपासात मान्य केले असले तरी प्रत्यक्षात खूप कमी मुली तक्रार नोंदविण्यास पुढे येत असल्याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. 

राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात - वडेट्टीवार

पीडित तरुणींना गोपनीयतेविषयी पोलिसांकडून विश्वास निर्माण केला जात नाही. तसेच त्यांचे समुपदेशन केले जात नाही, तोपर्यंत मुली तक्रार करण्यास पुढे येणार नसल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. तसेच यात प्रामुख्याने पीडित महिलांच्या व्यथा ऐकण्यासाठी व त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात महिला अधिकारी नेमावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Separate arrangements are needed for complaints of victims neelam gorhe