राज्यातील १४ सरकारी तंत्रनिकेतनांत अल्पसंख्याकां’साठी स्वतंत्र तुकडी

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे अल्पसंख्याक विभागाचे आवाहन
Separate detachments for minority students for admission in 14 government technical colleges in state
Separate detachments for minority students for admission in 14 government technical colleges in state google

पुणे : राज्यातील १४ सरकारी तंत्रनिकेतन संस्थांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरू करण्यात आली आहे. या तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने केले आहे. याबाबतची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मराठवाड्यातील हिंगोली, जालना, अंबड (जि. जालना), लातूर, नांदेड, वांद्रे (मुंबई), कोकण विभागातील रत्नागिरी, ठाणे विदर्भातील ब्रम्हपुरी (चंद्रपूर), जळगाव आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, कराड (जि. सातारा), सोलापूर येथील सरकारी तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक) आणि मुंबई येथील सरकारी मुद्रण तंत्रज्ञान संस्था (मुंबई) विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.

या सर्व विशेष तुकड्यांमध्ये मिळून अल्पसंख्याकांसाठी १ हजार १५५ जागा उपलब्ध आहे. यापैकी मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव आहेत. या तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अशा विविध अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना वार्षिक प्रत्येकी ७ हजार ७५० रुपये इतके प्रवेश शुल्क असणार आहे. शिवाय प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची मिळू शकणार आहे. केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न कमाल २ लाख तर, राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी कमाल ८ लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य आहे. या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी येत्या ३० जूनपर्यंत करता येणार आहे.

या प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी संपर्क

या तंत्रत्रनिकेतनमधील प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://poly22.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ०२२- ६८५९७४३०, ८६९८७८१६६९ किंवा ८६९८७४२३६० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com