
मुंबई : राज्यात स्वतंत्र ‘अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. आयोगासाठी पदनिर्मिती देखील केली जाणार आहे. नव्या आयोगाची स्थापना झाली असली तरी आधी अस्तित्वात असलेला अनुसूचित जाती आयोगदेखील स्वतंत्रपणे कार्यरत राहणार असून या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देण्याबाबत मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली. या आयोगाच्या स्थापनेमुळे अनुसूचित जमातींच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येणार आहे.