

Demand to Separate Special Assistance from Social Justice Department
sakal
मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती व दलित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी असलेला निधी योग्य ठिकाणी खर्च व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातून विशेष सहाय्य विभाग वेगळा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी लाल सेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीत विशेष सहाय्य विभागामुळे सामाजिक न्याय विभागाचा निधी योग्य योजना, उपक्रमांसाठी जात नाही. केवळ विशेष सहाय्य विभागाच्या नावाने तो इतरत्र वापरला जात असल्याने वंचित घटकांच्या बहुतांश योजनांना बाधा आल्याने त्यावर लालसेनेसह इतर संघटनांच्या प्रतिनिधींकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.