
औरंगजेबाचे कौतूक करणाऱ्या अबू आझमी यांना सेशन कोर्टाने दिलासा दिला आहे. वादग्रस्त विधानासाठी मुंबई दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अबू आझमींनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज कोर्टाने स्वीकारला आहे. 20 हजार रुपयांच्या बाँडवर अटकेपासून संरक्षण दिलं असून 12,13 आणि 15 मार्चला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देशही आझमी यांना दिले आहेत.