School Start | राज्यातील पाऊण लाख विद्यार्थी वीस महिन्यानंतर जाणार शाळेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school starts
राज्यातील पाऊण लाख विद्यार्थी वीस महिन्यानंतर जाणार शाळेत

राज्यातील पाऊण लाख विद्यार्थी वीस महिन्यानंतर जाणार शाळेत

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे - राज्यातील इयत्ता पहिली आणि दुसरीत असणारे तब्बल ३६ लाख ४८ हजार ४७५ विद्यार्थी एक डिसेंबरपासून पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणार आहेत. राज्यात सध्या १७ लाख ७० हजार ३९१ विद्यार्थी पहिलीत, तर १८ लाख ७८ हजार ८४ विद्यार्थी दुसरीमध्ये आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत बसून शिक्षण घेण्याचा आनंद डिसेंबरपासून घेता येणार आहे.राज्यातील इयत्ता पाहिले ते चौथीचे वर्ग येत्या एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात ऑक्टोबरपासून शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे आणि ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता तब्बल वीस महिन्यानंतर शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे आणि ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. राज्यातील तब्बल ७५ लाख ६४ हजार ८९० विद्यार्थ्यांनी वीस महिन्यांनंतर प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेऊ शकणार आहेत.गेल्या वर्षी इयत्ता पहिलीत असणारे आणि सध्या इयत्ता दुसरीत असणारे विद्यार्थी शाळा प्रवेश होऊनही तब्बल दोन शैक्षणिक वर्षांनंतर आता शाळेत जाणार आहेत. तर सध्या इयत्ता पहिलीत असणारे विद्यार्थीही सात महिन्यानंतर पहिल्यांदाच जाणार आहेत.

व्यवस्थापननिहाय इयत्ता पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांची संख्या :

व्यवस्थापन : पहिली : पहिली ते सातवी

सरकारी : ७,८५,३२० : ४९,६३,८७२

खासगी अनुदानित : ३,२५,०३३ : ४२,३०,९७४

खासगी विनाअनुदानित : ६,३९,७३२ : ४१,८४,७३५

अप्रमाणित : २०,३०६ : १,०६,२९८

एकूण : १७,७०,३९१ : १,३४,८५,८७९

पुणे जिल्ह्यातील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची संख्या :

व्यवस्थापन : पहिली : पहिली ते सातवी

सरकारी : ४,२१० : ३,८४,०५७

अनुदानित : १,३४६ : ३,२५,२५५

विनाअनुदानित : १,८९९ : ६,०९,५८१

एकूण : ७,४५५ : १३,१८,९०३

हेही वाचा: लसीकरणा पूर्वी शाळा सुरू करू नका

शिक्षकांची संख्या :

व्यवस्थापन : प्राथमिक शिक्षक

सरकारी : १,८४,३०७

खासगी अनुदानित : ५५,०५१

खासगी विनाअनुदानित : ८७,५४१

अप्रमाणित : ३,०६५

एकूण : ३,२९,९६४

सर्व नियम पाळू शाळा सुरू करण्यास उत्सुक : प्राथमिक शिक्षक संघ

‘इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी गेल्या वीस महिन्यांत शाळेत गेलेले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव आहे. हे वर्ग सुरू करावेत, अशी पालक आणि शिक्षकांची आग्रही मागणी होती. राज्य सरकारच्या हे वर्ग सुरू करण्याचा घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. सरकारचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यात येतील. त्यादृष्टीने शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे अशी पूर्व तयारी सुरू केली आहे.’

- अंबादास वाजे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

loading image
go to top