खैरे, दानवेंसाठी कोपऱ्यात खुर्च्या ठेवायच्या होत्या, मग...; शहाजी पाटील बरसले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Khaire_Ambadas Danave

खैरे, दानवेंसाठी कोपऱ्यात खुर्च्या ठेवायच्या होत्या, मग...; शहाजी पाटील बरसले

पैठण इथं शिवसेनेची सोमवारी जाहीर सभा पार पडली, या सभेत शहाजी पाटलांनी विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या लोकांवर सरसंधान साधलं. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील आणि अंबादास दानवे यांच्यावरही सडकून टीका केली. (Shahaji Patil slams on Chandrakant Khaire Ambadas Danve in Paithan Rally)

हेही वाचा: CM शिंदेंच्या हृदयात बुद्धाप्रमाणं करुणा; शहजी पाटलांकडून स्तुतीसुमनं

शहाजी पाटील म्हणाले, "आजच्या कार्यक्रमाची गर्दी दाखवण्यासाठी व्यासपीठावर दोन खुर्च्या कोपऱ्यात ठेवायच्या होत्या, त्या चंद्रकांत खैरे आणि अंबासाहेब दानवेसाठी. मग त्यांना कळलं असतं की, भुमरे मामाचा जनसागर आणि एकनाथ शिंदेंची महाराष्ट्रात जनमानसात ताकद काय आहे"

टीव्हीवर काय बोलता? मैदानात या

मैदानात या आणि भुमरे मामा काय आहे ते बघा. भुमरे मामा पाच वेळा निवडून आले आहेत. शेतकऱ्यांसाठी काम केलंय. अशा या भोळ्या भाबड्या माणसाला टीव्हीवर भरमसाठी बोलतात. भुमरे आणि एकनाथ शिंदे हे सगळं बघताहेत. आमचा नेता खंबीर आहे, त्यामुळं आम्हाला ५० जणांना काही काळजी नाही आम्ही निवांत उठतोय. तुम्हाला आता कधीच खासदारकी मिळणार नाही, तुम्ही आता खासदारकी विसरुन जा, अशा शब्दांत पाटील यांनी खैरेंवर सडकून टीका केली.

मतदारसंघासाठी ४०० कोटी मिळाले

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कामाचे यावेळी त्यांनी कौतुक केलं. म्हणाले, "गुलाबराव पाटील आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात प्यायच्या पाण्यासाठी ४०० कोटी रुपये दिले. १०० वर्षांच्या वाड्यावस्त्यांचा प्रश्न कायमचं निकाली लावला"

Web Title: Shahaji Patil Slams On Chandrakant Khaire Ambadas Danve In Paithan Rally

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..