Shahaji Bapu Patil: 'त्या' दोघांमुळे पडली ४० आमदार अन् उद्धव ठाकरे यांच्यात दरी; शहाजी पाटलांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahaji Bapu Patil: 'त्या' दोघांमुळे पडली ४० आमदार अन् उद्धव ठाकरे यांच्यात दरी; शहाजी पाटलांचा दावा

Shahaji Bapu Patil: 'त्या' दोघांमुळे पडली ४० आमदार अन् उद्धव ठाकरे यांच्यात दरी; शहाजी पाटलांचा दावा

आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी पडली, यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही राऊतांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर, या दोघांसोबतच अजूनही दोघं-तिघं यासाठी कारणीभूत आहेत अशी टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलीय. यावेळी बोलताना शहाजी बापू पाटील यांनी यावेळी थेट शिवसेना खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, "अंधेरी पोटनिवडणुकीची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसाठी सोडली आहे. या जागेवर युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडणूक लढवणार असून त्यांनी गेले तीन महिने काम केलेले असून त्यांना मागील निवडणुकीतही चांगली मतं पडली होती. त्यामुळे ही जागा भाजपला देण्यात आलीय.", बोलत असतानाच विजय मुरजी पटेल यांचाच अंधेरी पोटनिवडणुकीत विजय होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पुढे पाटील म्हणाले की, ज्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तेव्हापासून राजकारणात वेगवेगळ्या प्रकारची गणित चालू झाली आहेत, आगामी काळात अजूनही वेगवेगळी गणितं आणि आराखडे बघायला मिळतील.", असंही शहाजीबापूंनी सांगितलं आहे.

टॅग्स :CM Eknath ShindeShiv Sena