

शिवसेना नेत्यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान सोनिया गांधी यांच्या Belonging: A Journey of Love या पुस्तकाची पाने फाडत तीव्र निषेध व्यक्त केला. यादरम्यान शायना एनसी यांनी मणिशंकर अय्यर यांचा एक फोटो फाडला, ज्यामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे देखील दिसत होते. यानंतर राज्यासह देशभरात शिवसेना नेत्यांवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.