Sharad Pawar News : वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसलाच नाही! शालिनीताईंचा युटर्न; पवारांच्या मदतीला धावल्या…

shalini patil on sharad pawar ncp crisis criticized ajit pawar chhagan bhujbal over vasantdada patil govt collapse
shalini patil on sharad pawar ncp crisis criticized ajit pawar chhagan bhujbal over vasantdada patil govt collapse esakal

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर अजित पवार आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावरून आमने-सामने आले आहेत. यादरम्यान अजित पवार यांच्यावर टीका केली जात असून त्यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका देखील होत आहे.

यादरम्यान अजित पवारंसोबत गेलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जाहीर सभेत वसंतदादा पाटील यांची आठवन करून देत शरद पवारांवर निशाणा साधला होता. दरम्यान या सर्व राजकीय पार्श्वभूमिवर माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी शरद पवारांना लगावला आहे. यावेळी वसंतदादांचे सरकार पाडणाऱ्या शरद पवारांवर देखील त्यांनी भाष्य केले.

shalini patil on sharad pawar ncp crisis criticized ajit pawar chhagan bhujbal over vasantdada patil govt collapse
Sharad Pawar News : पवारांना विठ्ठल संबोधणं थांबवा, अन्यथा…; अजित पवार गटाला भाजपची तंबी

डॉ. शालिनीताई पाटील म्हणाल्या की, "अजित पावरांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला असं मी म्हणणार नाही, पण त्यांना ( शरद पवार) विचारून सल्ला घ्यायला पाहीजे होता. जो व्यक्ती सख्या काकांना सोडून रात्रीच्या अंधारात शपथ घ्यायला जाते ती उद्या भाजपचा विश्वासघात कशावरून करणार नाहीत? जी व्यक्ती स्वतःच्या काकांचा विश्वासघात करते ते परक्यांचा विश्वासघात करायला किती वेळ घेतील याचा विचार देखील केला पाहिजे." डॉ. शालिनीताई पाटील यांनी नुकतेच एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.

shalini patil on sharad pawar ncp crisis criticized ajit pawar chhagan bhujbal over vasantdada patil govt collapse
Sharad Pawar News : वसंतदादा आठवून देणाऱ्या भुजबळांना पवार देणार प्रत्युत्तर? राष्ट्रवादीतील बंडानंतर आज पहिलीच सभा

त्या पुढे म्हणाल्या की, "शरद पवारांनी वसंतदादांना सोडलं आणि त्यांना त्रास झाला. ती परिस्थिती आणि ही आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. वंसतदादांच्या वेळी जे घडलं आणि हे बाहेर पडले तेव्हा स्वतःच्या कुवतीने पुन्हा उभं राहण्याची त्यांची ताकद होती. तुम्ही स्वतःत्या कुवतीने उभे राहु शकता का? भुजबळांना विचारतील की नाही तुम्ही कोण आहात आणि काय केलत? दोन वर्ष जेलमध्ये कशासाठी गेलात?"

शरद पवार म्हणतायत ते पटतंय

"शरद पवार म्हणतायत ते मला पटतंय, ते म्हणतायत तुम्ही बाहेर पडलात तर तुमचं तुम्ही निर्माण करा. तुमचं तुम्ही नाव, चिन्ह ते निर्माण करा. आयतं राष्ट्रवादीच्या नावावर निवडूण आलेले आहेत त्यांना बरोबर घेऊन पक्ष बाहेर काढायचं.. तुम्हचं तुम्ही निर्णान करा हे तात्विक बरोबर आहे" असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.

shalini patil on sharad pawar ncp crisis criticized ajit pawar chhagan bhujbal over vasantdada patil govt collapse
Pune Crime News : पुणे हादरलं! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाची कोयता-कुऱ्हाडीने हत्या

तुम्हाला काय कमी पडलं?

"२५ वर्षांमध्ये २०१४ ते १९ भाजपची पाच वर्ष सोडली तर तु्म्ही मंत्री नंतर उपमुख्यमंत्री राहिलात. एक व्यक्ती २५ पैकी २० वर्षे सत्तेत राहिला तुम्हाला आणखी काय पाहिजे" असा थेट सवाल देखील शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांना केला.

पेरलं तेच उगवलं असं वाटतंय का?

वसंतदादा पाटील यांच्या सोबत केलं तेच आता शरद पवारांसोबत घडतंय असं वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना शालिनीताई पाटील म्हणाल्या की, "किती वेळ तेच घेऊन चालायचं? ज्यांच्या बद्दल तो अपराध केला त्यांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही शरद पवारांचं नेतृत्व माना. माझ्या बरोबर तेव्हाच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की पवारांच्या नेतृत्वाखाली काम करा. मग दादासाहेबांनी स्वतःच घडलेलं सगळं विसरून जा असं सांगितलं. आताची परिस्थिती वेगळी आहे."

"सध्या ऐनवेळी शरद पवारांना सोडून जाण्याचं कारण नव्हतं. तुम्हच्या वागण्याला तात्विक बेस नाहीये. तुम्हा दरोडे घालून आले आहेत आणि ती संपत्ती लपवून ठेवण्यासाठी सत्तेचं कव्हर मागताय. हे एक वर्षात अधिक स्पष्टपणे जनतेसमोर येईल आणि जनता याला साथ देणार नाही" असेही शालिनीताई पाटील म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com