

Shalinitai Patil death: Wife of former Maharashtra Chief Minister Vasantrao Patil passed away at her Mumbai residence.
esakal
Shalinitai Patil death: दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या, माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे आज(२० डिसेंबर) निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील माहीम येथील राहत्या घरीच त्यांचे निधन झाले. मागील काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या.
सातारामधील कोरेगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. एक लढाऊ आणि करारी बाण्याच्या राजकारणी अशी त्यांची प्रतिमा होती. कोरेगाव येथून त्या दोनदा आमदार झाल्या होत्या. याशिवाय १९८३मध्ये वसंतदादा पाटील यांनी राजीनामा दिला होता, त्यावेळी त्या सांगलीतून अल्पकाळासाठी लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.
एआर अंतुले यांच्या सरकारमध्ये त्या महसूलमंत्री देखील होत्या. १९८०मध्ये मराठा आरक्षणासाठीही त्यांनी हाक दिली होती. याशिवाय आर्थिक निकषांचाही आरक्षणा देताना विचार करता येईल का? यासाठी देखील त्या आग्रही होत्या. आपली मतं अतिशय निर्भिडपणे आणि स्पष्टपणे मांडणाऱ्या म्हणूनही त्यांना ओळखलं जायचं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.