Shambhuraj Desai: अफझल खानाच्या कबरीच्या मूळ ढाच्याला हात लावला नाही, तर शेजारच अतिक्रमण हटवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

Shambhuraj Desai: अफझल खानाच्या कबरीच्या मूळ ढाच्याला हात लावला नाही, तर शेजारच अतिक्रमण हटवलं

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण काढली आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी केली होती. कबरीजवळ पोकलेन मशीन तैनात केली असून अनेक ठिकाणी बॅरिगेट्स लावली आहेत. १९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता. याबाबत शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचाः कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

ते म्हणाले की, शंभुराज देसाई म्हणाले की, प्रतापगडच्या पायथ्याशी जी कबर आहे त्याच्या मूळ ढाच्याला हाथ लावला नाही. आतमध्ये असणारी कबर त्याचा ढाचा यांना कुठेही हाथ लावला नाही. त्याच्या शेजारी असणारी जागा, भिंतीचं बांधकाम,छत यांना हात लावलेला नाही. दरम्यान परिसरामध्ये असणारे वाढवलेले बांधकाम, वाढवलेली जागा आणि वाढवलेलं काम हे अनधिकृत आहे हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे. सुप्रीम कोर्टाकडून अतिरक्त बांधकाम हटवण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. त्यामुळे कोर्टाचे म्हणणे ऐकणे प्रशासनाचे काम आहे आणि ते कम पूर्ण करत आहेत असंही देसाई बोलताना म्हणालेत.

हेही वाचा: PHOTO : शिवप्रताप दिनी मोठी कारवाई; अफजलखानाच्या कबरीजवळची अतिक्रमणं हटवली

पुढे ते म्हणाले की, नियमित कामकाजाचा हा भाग आहे. अनेक दिवसांपासून हे काम सुरू होतं. आज त्याला अंतिम स्वरूप आले आहे. नियमित कामकाजाचा भाग आहे आजच औचित्य साधत हे काम होत आहे असं नाही हे बऱ्याच दिवसांपासून काम चालू आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. जे अनधिकृत आहे ते अनधिकृत आहे. ते काढलं पाहिजे आपण रस्त्याचं रुंदीकरण करताना अतिक्रमण हटवतो तसंच हे काम आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

हेही वाचा: मिरवणुकीत ‘अफजलखान वध’ ठरला लक्षवेधी

टॅग्स :Satara