esakal | पोलिसांची साडेबारा हजार पदे भरली जाणार : गृह राज्यमंत्री देसाई
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोलीत पत्रकार परिषदेत बोलताना गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई.

पोलिसांची साडेबारा हजार पदे भरली जाणार : गृह राज्यमंत्री देसाई

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : राज्यात पोलिस दलातील साडेबारा हजार पदे लवकरच भरली (Recruitment In Maharashtra Police) जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच पोलिसांच्या समस्या देखील प्राधान्याने सोडविला जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री तथा हिंगोली Hingoli जिल्हासंपर्क मंत्री शंभुराज देसाई (Minister Of State For Home Sambhuraj Desai) यांनी रविवारी (ता. १८) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हिंगोली जिल्ह्यात शिवसंपर्क अभियाना संदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते हिंगोली येथे आले होते. त्यावेळी घेण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil), आमदार संतोष बांगर (Santosh Bangar), महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरज, हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव आदींची उपस्थित होती. श्री.देसाई म्हणाले, की राज्यात पोलिस व आरोग्य विभागातील (Health Department) भरती प्रकिया होणार आहे. साडेबारा हजार पोलिसांची पदे भरली जाणार आहेत, ती प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलिसांची दोनशे घरे बांधणे गरजेचे आहे. (shambhuraj desai said, police recruitment very soon hingoli news glp 88)

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

पोलिसांच्या घरांसाठी साडेआठ कोटींची तरतूद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी केली आहे. पोलिसांच्या समस्या, अडचणीचे प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्या समोर मांडणार असुन ते या समस्या निश्चितच सोडवितील असे त्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात देखील पोलिसांची पदे रिक्त आहेत. तसेच पोलिसांच्या वसाहती व पोलिस ठाण्याच्या इमारतीचे देखील प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविणार आहे. हिंगोलीत कारागृहा संदर्भातील विचारलेल्या प्रश्ना बाबतीत ते म्हणाले की या संदर्भात प्रस्ताव आलेला नाही. मात्र जिल्ह्यात तशी गरज असल्यास चर्चा करून प्रस्ताव आल्यावर विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडणार आहे असे श्री. देसाई यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकार बाबतीत विचारलेल्या प्रश्नाचे उतर देताना ते म्हणाले महाविकास आघाडी सरकारचे सर्व निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. हे सरकार चांगले काम करित आहे. हे सरकार पडेल अशी वल्गना विरोधी पक्षाचे नेते करतात. मात्र दोन वर्षांचा कालावधी होत आहे हे सरकार चांगले काम करित असुन टिकून असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image