esakal | दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...
sakal

बोलून बातमी शोधा

दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : दीड वर्षांपूर्वी पसार झालेले हे प्रेमी युगल सापडले खरे, परंतु त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली. उसाच्या शेतातून त्यांनी जवळपास ४-५ किलोमीटर पोलिसांना पळवले. ही फिल्मीस्टाइल घटना ही घटना शुक्रवारी (ता.१६) विरगाव (ता.वैजापूर) भागात घडली. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. दोघांचे एकमेकांप्रति असलेले प्रेम पाहून, पोलिसही भारावून गेले. मुलगी पंधरा वर्षांची अल्पवयीन आणि मुलगा एकवीस वर्षांचा सज्ञान दोघांमध्ये प्रेम जुळले आणि दीड वर्षांपूर्वी दोघांनीही घर सोडलं. गुन्हा दाखल झाला पोलिसांची शोधाशोध सुरू केली. मात्र दोघेही काही सापडेनात. अखेर दीड वर्षानंतर फेसबुकवरून पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले. मात्र पोलिस समोर येताच दोघांनी पळ काढला. तीन चार किलोमीटर पळाल्यानंतर दोघांनी हातात हात धरत थेट कॅनॉलच्या पाण्यात उडी घेतली. शेवटी ते पोलिसांच्या हाती लागले. finally police found love couple in vaijapur tahsil of aurangabad district glp 88

हेही वाचा: मनसेने तोडले औरंगाबाद पालिका आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन

अशी आहे प्रेम कहानी?

वाळूज औद्योगिक वसाहतीत २१ वर्षीय मुलगा आईसह भाड्याच्या खोलीत राहत होते. दरम्यान, ज्या ठिकाणी भाड्याने राहायचा. त्याच घरमालकाच्या १५ वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध जुळले. दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. दोघांनी सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेत घर सोडण्याचा निर्णय घेतला. आणि शेवटी डिसेंबर २०१९ मध्ये दोघेही पळून गेले. मुलीच्या वडिलाने अपहरणाची तक्रार दिली. त्यानुसार वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र दोघांचाही थांगपत्ता लागत नव्हता. याच अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी सायबर सेलसह दामिनी पथक देखील परिश्रम घेत होते. शेवटी फेसबुकच्या आधारे सायबर सेलने त्या मुलाचा लोकेशन ट्रॅक केला. ते वैजापूर तालुक्यातील एका गावात असल्याचे समजले. शुक्रवारी सकाळीच दामिनी पथक औरंगाबादेतून रवाना झाले. स्थानिक पोलिसांची मदत घेत. सायबरकडून मिळालेल्या लोकेशनकडे पथक जात असतानाच रस्त्यातच हे जोडपे दिसले. मात्र पोलिसांना पाहताच दोघेही जीवाच्या आकांताने पळत सुटले. पोलिस ही दोघांना विनंती वजा आवाहन करीत थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत दोघेही पळत होते. तीन ते चार किलोमीटर पळाल्यानंतर समोर वाहणारे पाण्याचे कॅनॉल आले. पोलिस आपल्याला पकडतील आणि समोर रस्ता देखील नाही. अशा परिस्थितीत दोघांनी पोलिसांना शरण जाण्याऐवजी जीवाचा धोका पत्करत दोघांनी एकमेकांचे हात धरत त्या कॅनॉलमध्ये उडी घेतली. हे दृश्य पाहून काहीवेळा पोलिसही चक्रावले. दोघेही एकमेकांच्या सहाऱ्याने पाण्याच्या कॅनॉलमधून बाहेर आले. आणि पुन्हा सुसाट पाळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला अखेर उसाच्या शेतात लपलेल्या या प्रेमीयुगुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, उपायुक्त मीना मकवाना यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड, महिला पोलीस हिरा चिंचोलकर, मोहिनी चिंचोळकर, ईश्वरसिंग कहाटे, साबळे ,गणेश पंडुरे यांनी विरगाव पोलिसांच्या मदतीने केली.

हेही वाचा: पुलावरुन वाहन कोसळून भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

क्राईम पेट्रोल मालिका पाहून युक्ती सुचली

मात्र दोघांचे एकमेकांवरील दृढ प्रेम, एकमेकांवरील विश्वास आणि जीवापेक्षा एकमेकांची साथ पाहून पोलिस देखील भारावून गेले. पोलिसांनी दोघांना विश्वासात घेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडत असताना गावातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. क्राईम पेट्रोल सिरीयल पाहून दीडवर्ष पोलिसांना गुंगारा दिला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तेंव्हा क्राईम पेट्रोल सिरीयल पाहून पोलिसांपासून लपण्याची युक्ती सुचल्याचे त्याने सांगितले.

प्रेम करणे गुन्हा आहे का?

जेव्हा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्या त्या निरागस मुलीने साहेब कमी वयात प्रेम करणे गुन्हा आहे का? असा सवाल करत पोलिसांनाही अनुत्तरीत केले. दोघांनाही वाळूज एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

loading image