
अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात उघड झाल्यानंतर या मंदिराचे ट्रस्ट बरखास्त करून शिर्डी आणि पंढरपूर देवस्थानच्या धर्तीवर मंदिर विश्वस्त मंडळ तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.