ST कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ करारावर निर्णय ?मंत्र्यांच्या बैठकीत खलबतं | Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil parab-Shard Pawar

ST कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ करारावर निर्णय ?मंत्र्यांच्या बैठकीत खलबतं

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : वरळी स्थित नेहरू सेंटरमध्ये सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात सुमारे साडेचार तास बैठक झाली. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन (ST employee salary) वाढवण्याच्या दृष्ट्रीने सर्वच पर्यायांवर चर्चा करण्यात आली असून. संपाचा मध्यमार्ग काढून लवकरच एसटी कर्मचाऱ्यांचा 2020-24 या वेतनवाढ कराराचा (increment Agreement) निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा: RTI : कोविड फंडातून केवळ 25 टक्के रक्कमेचे वाटप; वाचा सविस्तर माहिती

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामूळे विद्यार्थींचे, ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत आहे. त्यामूळे शरद पवार यांनी ही बैठक बोलावली होती. दरम्यान एसटीचे अधिकारी, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची या बैठकीत मुख्य उपस्थिती होती. या बैठकीत एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्ट्रीने चर्चा झाली असून. एसटीची आताची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एसटी कशी रुळावर येईल त्याच्या उपाययोजना आणि संपकर्त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिवाय वेतनवाढीच्या विषय़ावर सुद्धा यावेळी या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. शिवाय इतर राज्यातील वेतन आणि महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची तुलना सुद्धा करण्यात आली आहे. मात्र, या चर्चेवरून अद्याप कोणत्याही ठोस निर्णय झाला नसल्याने अंतर्गत चर्चा माध्यमांना सांगता येणार नाही. मात्र, उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या पुढे एसटी कर्मचाऱ्य़ांचे वेतन वाढेल अशा सकारात्मक पद्धतीनेच बाजू मांडणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.

राज्य सरकार किंवा संपकर्त्यांनी ताणून चालणार नाही. यामध्ये नुकसान कर्मचाऱ्यांचे आहे. न्यायालयाने विलीनीरणाच्या मागणीसाठी समिती गठीत केली आहे. समितीच्या पुढे राज्य सरकार सुद्धा आपली बाजु सकारात्मक मांडणार आहे. त्यानंतर समितीचा जो अहवाल येईल तो मान्य राहणार आहे.

- अनिल परब, परिवहन मंत्री

loading image
go to top