कोविड फंडातून केवळ 25 टक्के रक्कमेचे वाटप; 606 कोटी शिल्लक | chief minister relief fund | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona fund

RTI : कोविड फंडातून केवळ 25 टक्के रक्कमेचे वाटप; वाचा सविस्तर माहिती

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : कोविडच्या काळात (corona pandemic) मदतीसाठी आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी (chief minister relief fund) अंतर्गत कोविड खात्यात (corona account) लोकांनी भरभरून आर्थिक मदत (financial help) केली. कोविड खात्यात आज पर्यंत 799 कोटी जमा झाले असून केवळ 192 (25 %) कोटीचा निधी (crore rupees expenses) खर्च करण्यात आला आहे. तर 606 कोटींचा निधी वापराविना पडून असल्याची माहिती आरटीआय (RTI) कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.

हेही वाचा: मुंबई उपनगर हाउसिंग फेडरेशन शिवसेनेकडे; अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर

मुख्यमंत्री सचिवालयाकडे एकूण जमा निधी, खर्च करण्यात आलेला निधी आणि शिल्लक निधी याची माहिती विचारली होती. मुख्यमंत्री सचिवालयाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 798 कोटी रक्कम जमा झाली असून आजमितीस 606 कोटी रक्कम शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. तर 192 कोटी 75 लाख 90 हजार 12 रुपयांचे वाटप केले आहे अशी माहिती गलगली यांना देण्यात आली.

अनिल गलगली यांच्या मते हा निधी फक्त कोविड प्रयोजनासाठी असल्याने आतापर्यंत खर्च शत प्रतिशत करणे आवश्यक होते. पण शासनाने केवळ 25 टक्के निधीचे वाटप केले आहे. इतका 606 कोटींचा निधी राखीव ठेवण्याचे नेमके प्रयोजन काय आहे? याची माहिती जनतेस देण्याची आवश्यकता आहे असे ही गलगली म्हणाले.

असा झाला खर्च

खर्च करण्यात आलेल्या रकमेपैकी 20 कोटी सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये कोविडसाठी विशेष आयसुआय सेटअपसाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत खर्च करण्यात आले. -कोविडच्या 25 हजार चाचण्यासाठी ABBOT M2000RT PCR या मशीनच्या कंझुमेबल्स विकत घेण्यासाठी 3 कोटी 82 लाख 50 हजार खर्च करण्यात आले. -औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत झालेल्या मजुरांच्या वारसांना 80 लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले. -स्थलांतरित मजुरांचे श्रमिक रेल्वे शुल्कासाठी 82 कोटी 46 लाख 94 हजार 231 रुपये खर्च करण्यात आले.

-रत्नागिरी आणि जालना जिल्ह्यात कोविड 19 च्या चाचण्या करण्यासाठी क्रमशः 1 कोटी 7 लाख 6 हजार 920 रुपये खर्च करण्यात आले. 

-प्लाझ्मा थेरेपीच्या चाचण्या करण्यासाठी 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, 4 पालिका वैद्यकीय महाविद्यालय, 1 टीएमसी वैद्यकीय महाविद्यालय यांस 16.85 कोटी रुपये देण्यात आले.

-माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी या अभियानासाठी 15 कोटी आयुक्त, राज्य स्वास्थ्य संस्था यांस देण्यात आले.

-कोविड साथी दरम्यान देह विक्री करणा-या महिलांना 49 कोटी 76 लाख 15 हजार 941 रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले.

-कोविड आजारा अंतर्गत म्युटंट मधील व्हेरिएन्टचे संशोधनाकरिता जिनोम सिक्वेसिंग करीता 1 कोटी 91 लाख 16 हजार खर्च करण्यात आले.

loading image
go to top