Shrad Pawar
Shrad Pawar

Sharad Pawar : "उद्धव ठाकरेंचं मंत्रालयात फक्त दोन वेळा जाणं, हे..." ; शरद पवारांचा थेट हल्ला

Sharad Pawar : उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत म्हणून शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली.

बंड केलेले सर्व आमदार, खासदार उद्धव ठाकरे भेटण्यासाठी वेळ देत नव्हते, अशी तक्रार करत होते. अनेक शिवसेनेतील अनेक नेत्यांना मातोश्री व वर्षा बंगल्याबाहेर उद्धव ठाकरेंच्या भेटीची वाट पाहावी लागत होती. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले होते.

दरम्यान शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

Shrad Pawar
पहाटेचा शपथविधीनंतरही पवारांनी अजित पवारांना माफ का केलं? आत्मचरित्रात मोठा खुलासा | Sharad Pawar Autobiography

उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी प्रकृतीचा विचार करुन भेट घ्यावी लागत होती. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलताना असलेली सहजता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बोलताना संवादातील सहजता जाणवत नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती यामुळे भेटायला वेळ ठरवावी लागत होती, असा खुलासा शरद पवार यांनी पुस्तकात केला आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

Shrad Pawar
Niteh Rane: "अजितदादा करमुक्त, त्यांना सर्वच माफ"; सभेतील टीकेनंतर नितेश राणेंचा पवारांवर निशाणा

उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात फक्त दोन वेळा जाणं, हे आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं. रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचं वर्तमान कळत होतं, यावेळी मी वडिलकीच्या नात्यांने त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडिंची बितंबातमी हवी. त्याचं यावर हारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल. याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी आणि त्यानुसार आजच काय पावलं उचलायला पाहिजेत, हे ठरलवायचं राजकिय चातुर्य हवं. या सर्व बाबतीत आम्हाला सर्वांनाच कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्यानं हे घडत असलं, तरी ते टाळता आलं असतं, असे शरद पवार म्हणाले.

महाविकास आघाडी महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांनी पहिल्याच टप्प्यात माघार घेतली. त्याचंही कारण शारीरीक अस्वास्थ्य हेच असावं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यामुळे शिवसेनत वादळ माजेल, याचा मात्रा आम्हला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं. संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असे शरद पवार यांनी यांनी स्पष्ट केले.

Shrad Pawar
Mohit Kamboj : 'त्या' बारमध्ये मोहित कंबोज नेमके कशासाठी गेले होते?; पत्रकार परिषेद स्वतः केला खुलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com