Niteh Rane: "अजितदादा करमुक्त, त्यांना सर्वच माफ"; सभेतील टीकेनंतर नितेश राणेंचा पवारांवर निशाणा

बीकेसीतील वज्रमुठ सभेत अजित पवारांनी नितेश राणेंवर शेलक्या शब्दांत टीका केली होती.
Nitesh rane on ajit pawar remark over narayan rane defeated twice election after he left shiv sena watch video
Nitesh rane on ajit pawar remark over narayan rane defeated twice election after he left shiv sena watch video

मुंबई : मुंबईतील बीकेसीत झालेल्या वज्रमुठ सभेत सोमवारी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना आता राणे यांनी पत्रकार परिषद घेत अजितदादांवर निशाणा साधला आहे. (Ajit Pawar tax free person after criticism in Vajrmuth rally Nitesh Rane targets Ajit Pawar)

Nitesh rane on ajit pawar remark over narayan rane defeated twice election after he left shiv sena watch video
Santosh Bangar: मिशा स्वतः काढता की...; राऊतांचा बांगरांना टोला

नितेश राणे म्हणाले, "काल सभेत अजितदादांनी माझ्यावर टीका केली. तसं म्हटलं तर अजितदादांना सर्वच माफ आहे, ते करमुक्तआहेत. त्याच्यावर मी काही टीका करणार नाही. पण संजय राऊतांच्या मालकाला उद्धव ठाकरेंना सांगेन की, तुमच्यावर बोलल्यानंतर तुम्हाला खूप झोंबतं. पण तुमचा सकाळचा कर्मचारी जो रोज सकाळी येऊन आमच्या नेत्यांच्यावर वैयक्तिक टीका करतात ते तुम्हाला इतके दिवस दिसलं नाही"

Nitesh rane on ajit pawar remark over narayan rane defeated twice election after he left shiv sena watch video
'वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचा कार्यक्रम'; मविआच्या सभेवर फडणवीसांचा टोला | Devendra Fadnavis

"मी अजून दोन टक्केच माहिती बाहेर काढली आहे. मी पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की मी किती माहिती काढावी आणि महाराष्ट्राला द्यावी, हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुमचा कामगार माझ्या नेत्यावर माझ्या पक्षावर बोलायचं बंद करेल तर माझ्या पत्रकार परिषदा बंद होतील"

Nitesh rane on ajit pawar remark over narayan rane defeated twice election after he left shiv sena watch video
Mohit Kamboj : 'त्या' रात्री मोहित कंबोज यांच्यासोबत असलेल्या मुलीचा मोठा खुलासा

फडणवीस, चंद्रकांत पाटील, बावनकुळे यांच्यावर तुमचे नेते वैयक्तीक टीका करतात. पुढे जाऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लहान नातवावर वैयक्तिक टीका करता. तुम्ही काहीही बोलत बसलात तर आम्ही गप्प बसणार नाही. तुमच्या शकुनी मामाला सांगा मुद्द्यावर बोला. वैयक्तिक टीका करायची नाही, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.

Nitesh rane on ajit pawar remark over narayan rane defeated twice election after he left shiv sena watch video
Maharashtra Politics: राज्य सरकारसमोर बच्चू कडूंनी हात टेकले; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केला मोठा खुलासा

माझ्या अजून पत्रकार परिषदा झाल्या तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं अवघड होऊन जाईल. अदानींवर चरित्र लिहिलं पाहिजे असंही उद्धव ठाकरे सभेत म्हणाले. पण असं चरित्र लिहिण्यापेक्षा प्रत्येक मराठी तरुण-तरुणींसाठी उद्धवजी तुमचं एक चरित्र लिहा ना. कुठलंही काम न करता, धंदा न करता, तुमच्या ऑफिसचा पत्ता नसताना पण तुमच्याकडं एवढी संपत्ती आली कुठून? तुमच्या मातोश्रीचं एकचं दोन झालं कुठून, तुम्ही मोठमोठ्या गाड्या फिरवता यासाठी तुमचा इन्कम काय? अदानींचे उद्योग आम्हाला माहिती आहेत, पण तुमचं काय? असे सवालही नितेश राणेंनी पत्रकार परिषदेतून केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com